खासगी डॉक्टर कोरोनाबाधित खोपोली ः प्रतिनिधी एप्रिल महिन्यात खोपोलीतील ज्या शास्त्रीनगर भागात कोरोना रुग्ण आढळून शहर ठप्प झाले होते, त्याच शास्त्रीनगरमधील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलमधील डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सदर माहिती कळताच खोपोली नगरपालिका प्रशासन पुन्हा कामाला लागले असून, सदर डॉक्टरांच्या थेट संपर्कात व या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या …
Read More »पेट्रोलपंपावर दुचाकीने घेतला पेट
अग्निरोधक सिलिंडरने विझवली आग खोपोली ः बातमीदार सॅनिटायझर फवारणीत दुचाकीला आग लागल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतानाच शिळफाटा खोपोली येथील पेट्रोलपंपात दुचाकीने पेट घेतल्याने एकच पळापळ झाली, परंतु पंपातील कर्मचार्याने प्रसंगावधान राखत अग्निरोधक सिलिंडरचा मारा केल्याने आग विझली आणि मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी दुपारी शिळफाटा पेट्रोलपंपात दुचाकीस्वाराने दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर …
Read More »पावडरचे दूध पाजताना…
आरोग्य प्रहर प्रसूतीनंतर तासाभरातच बाळाला स्तनपान करणे गरजेचे असले तरी अनेक खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाल्यांनतर बाळाला सर्रास पावडरचे दूध पाजण्याकडे खासगी रुग्णालयांचा कल वाढत आहे. एकीकडे सिझेरियन झालेल्या मातेला पहिले 24 तास स्वत:हून मुलाला जवळ घेऊन दूध पाजणे शक्य नसते आणि दुसरीकडे बाळ बाहेर आल्यानंतर आईद्वारे होणारा साखरेचा …
Read More »कर्जत तालुक्यात रुग्ण वाढले
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर पोहचली असून दोन नवीन रुग्णांची त्यात भर पडली आहे. कर्जत शहर आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून ते दोन्ही रुग्ण तरुण असून आपल्या घरातून अंबरनाथ, बदलापूर असे रोज ये-जा करीत आहेत. कर्जत शहरातील मुद्रे …
Read More »निसर्ग चक्रीवादळाने मुरूडमध्ये घरांचे नुकसान
मुरूड : निसर्ग चक्रीवादळाने घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार कोलमडले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »रेवदंडा परिसरात घरांसह बागा, आमराईचे नुकसान
Nisarga Cyclone रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रेवदंडा, चौल, नागाव परिसरात घरांसह नारळ व सुपारीच्या बागा, तसेच आमराईचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने वादळग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेनुसार संचारबंदी घोषित करण्यात आली होता. समुद्र …
Read More »मुरूड वीज मंडळाला नुकसानीचा ‘शॉक’
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. 250हुन जास्त विद्युत खांब, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागेल, असे मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी म्हटले आहे. वादळ झाल्यापासून मुरूड …
Read More »पावसाळ्यात थंडी वाजून ताप आल्यास सावधान!
आरोग्य प्रहर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असलेल्या आजारांमध्ये कावीळ हा आजारसुद्धा आहे. काविळीमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते तसेच त्वचेचा रंग पिवळा पडतो. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर बिलीरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर येत असतो. याचे …
Read More »चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा उद्ध्वस्त
वीज नाही, पाणी नाही, संपर्कही नाही! रोहेवासीयांची बिकट अवस्था रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ थांबले, परंतु त्याचे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा, खांब पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नळपाणी पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे …
Read More »वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, …
Read More »