Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

म्हसळा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

म्हसळा : प्रतिनिधीम्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावात एका मृत व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. संबंधित व्यक्ती मुंबईतून येथे आली होती. म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायती व म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी, बौद्धवाडी या विविध वस्त्यांमध्ये किमान 1800 ते 2100 चाकरमानी मुंबईवरून …

Read More »

अर्थव्यवस्थेला उभारी देणारे व आत्मनिर्भर भारत घडवण्याची दिशा ठरणारे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज

कोविड-19च्या संकटाशी लढण्याकरिता प्रधानमंत्र्यांनी भारताच्या सकल उत्पन्नाच्या सुमारे 10% असणारे 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले व या पॅकेजचे देशातल्या अर्थतज्ञांनी स्वागत केले आहे. प्रधानमंत्री पॅकेजचा आपण जर संपूर्ण अभ्यास केला तर एकाच वेळेला या देशातल्या गरीब वर्गाला जगवण्याकरिता जे आवश्यक आहे ते या पॅकेजमध्ये आहे. त्याच वेळेला या देशाची …

Read More »

अलिबागमध्ये राज्य सरकारविरोधात निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सराकर अपयशी ठरले आहे. राज्य शासनाच्या या नाकर्तेपणाचा दक्षिण रायगड जिल्हा भाजपातर्फे शुक्रवारी (दि. 22) निषेध करण्यात आला. भाजपच्या अलिबाग येथील कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रनिधिमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सादर केले. या वेळी दक्षिण रायगड जिल्हा …

Read More »

कर्जतमध्ये 57 ठिकाणी आंदोलन

कर्जत : बातमीदार राज्यात सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या धोरणांमुळे कोरोनावर मात करण्यात अपयश आले आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार कर्जत तालुक्यात शहरात आणि 38 गावात तब्बल 57 ठिकाणी काळे कपडे आणि काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने …

Read More »

रायगडात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’

भाजपकडून राज्य सरकारविरोधात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन खोपोली : प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने रायगडात खालापूर, खोपोली, अलिबाग आदी ठिकठिकाणी निषेध निदर्शने केली, सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी आपापल्या घरासमोरील अंगणात आंदोलनाचा कार्यक्रम केला. सोशल डिस्टन्सिंग व संचारबंदी नियमांच्या अधीन राहून कार्यकर्त्यांनी आघाडी …

Read More »

खोपोलीत संशयिताची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

खोपोली : बातमीदार – कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरातून खोपोलीत दाखल झालेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ताप व अन्य त्रास होत असल्याने या व्यक्तीची कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी उशिरा प्राप्त झाला. हा अहवाल निगेटीव्ह असल्याने नगर परिषद प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला …

Read More »

पेण कासूमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीसह कुटुंबीयांना धमकी; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमातून पेण तालुक्यातील कासू येथील फिर्यादी मुलगी व तिच्या कुटुंबीयांना रावे येथील आरोपीने धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कासू यांना आरोपीसोबत लग्न करावयाचे नसतानासुद्धा आरोपीने 15 ते 19 मार्चदरम्यान …

Read More »

महाड बाजारपेठ झाली खुली; गर्दीने गाठला उच्चांक

महाड : प्रतिनिधी – महाड बाजारपेठ खुली करण्यात आली असून, सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस बाजारात गर्दीने उच्चांक गाठला आहे. सर्वच दुकानांतून अंतर ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवला जात असल्याने महाड शहरवासीयांना धोका निर्माण झाला आहे. मुंबई, पुण्यातून मूळ गावी परतलेले …

Read More »

मिनीडोअर वाहतूक सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी

रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर संघटनेची मागणी पेण : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे मिनीडोअर प्रवासी सेवा बंद झाल्याने चालक व मालकांचे प्रचंड हाल झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वाहने उभी असल्याने आर्थिक उत्पन्नच थांबल्याने उपासमारीची वेळ आली. त्यामुळे शासनाने ही वाहने शेअर पद्धतीने सहा+एक या पद्धतीने सुरू करण्यास परवानगी द्यावी किंवा प्रत्येक रिक्षा, …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवू नका -वनाधिकारी

नागोठणे : प्रतिनधी – नागोठण्यात आढळलेला प्राणी हा हिंस्र प्रकारातील नसून ते रानमांजर होते, असा निर्वाळा येथील वन विभागाचे मुख्य वनाधिकारी किरण ठाकूर यांनी दिला असून, स्थानिक जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे. नागोठणे शांतीनगर भागातील सूर्यदर्शन कॉलनी तसेच टॉकीज परिसरात गुरुवारी (दि. 21) सायंकाळी वाघ …

Read More »