रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट आल्यावर जगभर मंदीचे सावट आहे. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. रोहा तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना याचा फटका बसला आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात सुमारे 800 कोटींचे उत्पादन बुडाले आहे. देशात व राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना …
Read More »कोरोना लढ्यात लोणेरे येथील विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून योगदान
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास 21 हजार रुपयांचा धनादेश माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सामाजिक जाणीवेतून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याकरिता रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 12 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे …
Read More »नेरळजवळ गावठी हातभट्टी उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार – उल्हास नदीच्या तीरावर उकरूळ गावाच्या हद्दीत नेरळ पोलिसांच्या पथकाने गावठी दारुभट्टी उद्ध्वस्त केली. या ठिकाणाहुन साधारणत: 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत उकरूळ गावच्या मागे उल्हास नदीच्या तीरावर गावठी दारूभट्टी सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांना मिळाली …
Read More »पनवेल तालुक्यात दोन रुग्णांचा मृत्यू
25 नवे रुग्ण; जिल्ह्याचा आकडा सहाशेपार पनवेल ः प्रतिनिधीपनवेल ग्रामीणमध्ये गुरुवारी (दि. 21) 12 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी देवद (सुकापूर) येथील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कसालखंड दोन, चिखले, अष्टा, पळस्पे, वहाळ, उलवे आणि विचुंबे येथे प्रत्येकी एक नवीन …
Read More »जिल्ह्यात 33 नवीन कोरोना रुग्णांची वाढ
अलिबाग : जिमाका – जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे. जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या 1 मार्च ते 21 मे – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा इन्क्युबेशन कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या-1 …
Read More »पेणमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार
पेण : प्रतिनिधी – पेण तालुक्यातील महिला फिर्यादी (रा. महाडिकवाडी) हिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी (रा. रोडे काश्मिरे) याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माहिती अशी कि, दिनांक 11 मार्च 2020 ते दि.19 मे 2020 दरम्यान आरोपी (रा.रोडे काश्मिरे ता.पेण) याने 11 मार्चपासून महिला फिर्यादी (रा.महाडीकवाडी ता.पेण) …
Read More »रोहा नगर परिषदेच्या चोरी झालेल्या फॉगिंग मशिन सापडल्या
रोहे ः प्रतिनिधी कोेरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने वापरात येत असलेल्या दोन फॉगिंग मशिन डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहातून चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. आश्यर्य म्हणजे दुसर्या दिवशी या फॉगिंग मशिन सापडल्या आहेत. आता मशिन कोणी चोरली होती याचा पोलीस शोध घेत आहेत. रोहा-कोलाड मार्गावरील …
Read More »शेतकर्यांसाठी शेताच्या बांधावरच खतपुरवठा
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गामुळे कर्जत तालुक्यातील सर्व शेतकर्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी शेताच्या बांधावरच बियाणे, खते, कीटकनाशके मिळणार आहेत. त्यासाठी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कर्जत तालुका पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. तालुक्यात तब्बल 27 हजार हेक्टर …
Read More »कोर्लईच्या वेशीवरच कोरोना तपासणी केंद्र
रेवदंडा ः प्रतिनिधी कोर्लई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून गावाच्या वेशीवर कोरोना तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत असलेले चाकरमानी गावाकडे परतत आहेत. कोर्लई गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले जात आहे, परंतु त्यांनी प्रारंभी आरोग्य तपासणीस सामोरे जावे, …
Read More »हृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी
आरोग्य प्रहर आपल्या शरीरातील हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाला जपणं म्हणजे त्याच्या कामात येणार्या अडथळ्यांना दूर करणं. रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्या आकुंचित होणं किंवा त्यांच्या मार्गात काही साठल्याने रक्त वाहण्याला अडचण येणं म्हणजे हृदयाचे अडथळे. जगातील एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात. आपलं हृदय दर मिनिटाला साधारण …
Read More »