Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शेतकर्यांसाठी शेताच्या बांधावरच खतपुरवठा

कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गामुळे कर्जत तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी शेताच्या बांधावरच बियाणे, खते, कीटकनाशके मिळणार आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या पर्यवेक्षक, कृषी सहायकांशी संपर्क साधून आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कर्जत तालुका पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जायचा. तालुक्यात तब्बल 27 हजार हेक्टर …

Read More »

कोर्लईच्या वेशीवरच कोरोना तपासणी केंद्र

रेवदंडा ः प्रतिनिधी कोर्लई येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून गावाच्या वेशीवर कोरोना तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत असलेले चाकरमानी गावाकडे परतत आहेत. कोर्लई गावाच्या वतीने त्यांचे स्वागत केले जात आहे, परंतु त्यांनी प्रारंभी आरोग्य तपासणीस सामोरे जावे, …

Read More »

हृदयविकाराचा धोका वर्तवणारी होमोसिस्टीन चाचणी

आरोग्य प्रहर आपल्या शरीरातील हृदय हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. हृदयाला जपणं म्हणजे त्याच्या कामात येणार्‍या अडथळ्यांना दूर करणं. रक्त वाहून नेणार्‍या रक्तवाहिन्या आकुंचित होणं किंवा त्यांच्या मार्गात काही साठल्याने रक्त वाहण्याला अडचण येणं म्हणजे हृदयाचे अडथळे. जगातील एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयविकारामुळे होतात. आपलं हृदय दर मिनिटाला साधारण …

Read More »

पीओपी मूर्तिबंदीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी

गणेश मूर्तिकारांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील पेणमधील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पर्यावरण मंत्रालयाने या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी आता गणेश मूर्तिकारांकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल; भाजपच्या कोकण दौर्‍याला पनवेलपासून सुरुवात पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जे अत्यावश्यक सेवेत काम करीत आहेत अशा कोविड योद्ध्यांच्या सुरक्षिततेची काळजी शासन घेऊ शकले नाही. त्यामुळे …

Read More »

अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू; पनवेलमधील रुग्णसंख्या चारशेपार

अलिबाग, पनवेल, उरण : प्रतिनिधी, वार्ताहरअलिबाग तालुक्यातील बहिरोळे-मापगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.  उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 19) मृत्यू झाला. अलिबागमधील कोरोना पॉझिटिव्हचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती कॅन्सरबाधित होती. याशिवाय जिल्ह्यात मंगळवारी 25 रुग्ण आढळले. त्यात पनवेल महापालिका हद्दीतील 18, पनवेल ग्रामीणमधील दोन, पेण तालुक्यातील …

Read More »

गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

पेण ः प्रतिनिधी गणेशमूर्ती परदेशात किंवा देशातील विविध भागांत वेळेवर पोहचण्यासाठी त्यांना वाहतूक परवाना मिळावा याबाबत शासनाशी चर्चा करून तो लवकर मिळवून देण्यासाठी तसेच गणेश मूर्तिकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या बैठकीत केले. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा, पाहणी व …

Read More »

आमदार गोपीचंद पडळकर शिंग्रोबाचरणी नतमस्तक

खालापूर : प्रतिनिधी – धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 19) धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या शिंग्रोबाच्या बोरघाटातील वीर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी नारळ फोडून देवाकडे साकडे घातले. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने …

Read More »

लॉकडाऊनमध्ये रायगडात अडकलेले 24 हजार 729 मजूर स्वगृही रवाना

अलिबाग : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यासह शेजारील नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा राज्यातील तब्बल 24 हजार 729 मजूर व व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी पाच, झारखंडकरिता तीन, उत्तर प्रदेशकरिता सहा, राज्यस्थानकरिता एक, तर बिहार आणि ओडिशासाठी प्रत्येक …

Read More »

मिठेखारच्या सात जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्‍या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र नुकतीच घटना घडल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने मृत महिलेच्या घरातील सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिठेखारमधील महिलेवर अलिबाग येथील जिल्हा …

Read More »