पेण : प्रतिनिधी येथील जलतरणपटू स्वराली म्हात्रे हिने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे सागरी अंतर 12 तास व 31 मिनिटांत पोहून नुकतेच पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. स्वराली म्हात्रे हिने 3 मार्च रोजी पहाटे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात …
Read More »40 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत; कशेडी घाट पर्यायी बोगद्याचे काम युद्धपातळीवर
अलिबाग : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बोगद्यामुळे 40 मिनिटांच्या या प्रवासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत कापता येणार आहे. त्याचबरोबर अपघातदेखील टळणार आहेत. कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. …
Read More »दिव्यांग ऋषिकेशने केला दुर्गराज रायगड किल्ला सर
म्हसळा : प्रतिनिधी सेरेब्रल पाल्सी या असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश सुदाम माळी (वय 16) या विद्यार्थ्याने नुकताच रायगड किल्ला चढून पंगू लंघयते गिरिम हे वचन खरे ठरवले. ऋषिकेश माळी हा म्हसळ्याच्या एआयजे कॉलेजच्या 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळास नमन करून गिरिभ्रमणास …
Read More »शेतकर्यांना न्याय मिळवून द्या!
धेरंड, शहापुरातील शेतकर्यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना साकडे अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील धेरंड, शहापूर गावातील शेतकर्याच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. याबाबत विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात आवाज उठवावा, या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …
Read More »वैद्यकीय महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धा; खेळाच्या विविध प्रकारांचा समावेश
अलिबाग : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग येथील चं. ह. केळुसकर होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्राचार्य डॉ. आर. जे. जैन यांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्ज्वलित करून उद्घाटन झाले. या वेळी पर्यावरणाचा र्हास कमी व्हावा यासाठी आजूबाजूच्या गावांमध्ये झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत …
Read More »प्रशांत मोकल गोवा कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी
पेण : पेण तालुक्यातील कारावी गावचे सुपुत्र व प्रशांत फाऊंडेशनचे संस्थापक प्रशांत मोकल यांची जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी गोवा राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. प्रशांत मोकल यांनी आपल्या चढाईने एक काळ गाजविला. नवतरुण करावी या आपल्या संघाला त्यांनी अनेकदा विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्या आक्रमक चढायांमुळे प्रतिस्पर्ध्यांच्या …
Read More »म्हसळ्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई
म्हसळा : प्रतिनिधी गुटखा विक्री केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू असा एकूण चार हजार 528रुपयांचा माल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक डूस यांनी सांगितले. या प्रकरणी रामचंद्र मारोतराव भरकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला …
Read More »हेटवणे पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी
आमदार रविशेठ पाटील यांची विधानसभेत मागणी पेण : प्रतिनिधी खारेपाट विभागातील हेटवणे-शहापाडा पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील 36 गावे व 42 वाड्यांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हेटवणे- शहापाडा ही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली …
Read More »खंडाळा घाटात टेम्पोने बाइकस्वारांना चिरडले
भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार खोपोली, खालापूर : प्रतिनिधीअलिबाग बीचवर सुटीची मजा लुटून तळेगावकडे परतणार्या पाच तरुणांवर काळाने रविवारी (दि. 1) रात्री बोरघाटात घाला घातला. भरधाव टेम्पोने लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण या अपघातातून बचावला आहे.मूळचे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी येथील …
Read More »अफवांवर विश्वास ठेवू नका!, मुरूडमध्ये पोलिसांचे आवाहन
मुरूड : प्रतिनिधी सध्या देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविषयी गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येणार्या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी रविवारी (दि. 1) येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यामध्ये रविवारी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक …
Read More »