Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

बंडू खंडागळे यांची भाजप जिल्हा चिटणीसपदी फेरनियुक्ती

पेण : प्रतिनिधी भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदावर बंडू  खंडागळे यांची फेरनियुक्ती झाल्याने पेण शहर व तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी बंडू खंडागळे यांचे अभिनंदन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 9 नोव्हेंबर 2016 रोजी बंडू खंडागळे यांची जिल्हा चिटणीस म्हणून नियुक्ती केली …

Read More »

म्हसळ्यातील तीन गावठाणे गायब

महसुली लेखांत प्रचंड तफावत म्हसळा : प्रातिनिधी म्हसळा शहरातील तब्बल तीन गावठाणांबाबत महसुली अभिलेख व भूमी अभिलेख यामध्ये तफावत असल्याचे पुढे आले आहे. शहरात सात गावठणे असल्याचे महसुली लेखे उपलब्ध आहेत. तर तालुका भूमी अभिलेख खात्याच्या रेकॉर्डप्रमाणे  शहरात केवळ चार गावठाणांची नोंद आहे. त्यामुळे तीन गावठाणांचे महसुली लेख भूमी अभिलेख …

Read More »

रायगडात जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान

पोलीस ठाण्यांमध्ये महिलांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये रविवारी (दि. 8) दैनंदिनी कर्तव्याकरिता महिलांची नेमणूक करून रायगड पोलीस दलातर्फे जागतिक महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुक असलेल्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे …

Read More »

उदय देवरे ’विहान श्री’चा मानकरी

नागोठणे : प्रतिनिधी विहान बॉडी केअरच्या वतीने ’विहान श्री 2020’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील जोगेश्वरीमाता देवस्थानच्या रंगमंचावर शनिवारी (दि. 7) सायंकाळी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुरेश जैन, रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष …

Read More »

रोह्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला मध्यरात्री अटक रोहे ः प्रतिनिधी उदरनिर्वाहासाठी रोह्यात आलेल्या एका कुटुंबातील 11 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अष्टमी येथे समोर आली आहे. या घटनेची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी एकत्र येत रोहा पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर आरोपीविरोधात शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ दिवसांनंतर …

Read More »

द्रुतगती मार्गावर एसटीचा अपघात, सहा जखमी

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाक्यावर  ठाणे-पारनेर एसटी बसला शनिवारी (दि. 7) पहाटे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. एसटी चालक भाऊसाहेब गोरक्षनाथ शिरसाठ (वय 33, रा. बीड) यांनी खालापूर टोल नाक्यावर एसटीचा वेग कमी केला. त्याचवेळेस पाठीमागून वेगात आलेला …

Read More »

खोपोलीत महिलांकडून महिलांचे कौतुक

सहजसेवा फाऊंडेशनचा महिला दिन उत्साहात खालापूर : प्रतिनिधी महिला दिनानिमित्ताने सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत असणार्‍या महिलांचा शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. महिलांनी महिलांचा केलेला गौरव मनास भावून जातो, जबाबदारीने कार्य करणार्‍या महिलांना समाजाने अधिक पुढे येण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती वैशाली जाधव …

Read More »

…तरी महिलांसमोरील आव्हाने कायम

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे मत; अलिबाग प्रेस असोसिएशनच्या तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण अलिबाग : प्रतिनिधी  काळ बदलला असला तरी महिलांसमोरील आव्हाने कमी झालेली नाहीत, ती आजही कायम आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल तर महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यासाठी मुले आणि पुरुषांचे प्रबोधन व्हायला हवे, असे मत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी …

Read More »

येत्या 15 मार्चपासून रो रो सेवा होणार सुरू

अलिबाग : प्रतिनिधी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रोल ऑन रोल ऑफ (रो रो) जलवाहतूक सेवेची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. येत्या 15 मार्च रोजी या सेवेला प्रारंभ होणार आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत मुंबई महानगराला जोडणार्‍या मार्गावर रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भाऊचा धक्का …

Read More »

लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण

खोपोली : प्रतिनिधी लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला जबरदस्तीने चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोशन रामचंद्र कुरंगळे (रा. रिस कांबे, ता. खालापूर) याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीचे 2017 साली झालेले लग्न मोडले होते. त्यानंतर …

Read More »