कर्जतमध्ये अपहरणकर्त्यांना तत्काळ अटक कर्जत : बातमीदार तालुक्यातील सांगवी गावातील तरुणाचे गुरुवारी (दि. 20) रात्री साडेअकरा वाजता चार पांढर्या रंगाच्या गाड्यांमधून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर कर्जत पोलिसांनी अवघ्या चार तासांत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांनी या घटनेत वापरलेल्या गाड्यादेखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. …
Read More »भाजपची कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाची पुढील दोन वर्षांसाठीची कार्यकारिणी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारीही निश्चित करण्यात आले असून, त्यांची नावे पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष …
Read More »भाजप चषक क्रिकेट स्पर्धा; एम. सी. सी. चोरढे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी
रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील मिठेखार येथील मैदानात येसदे सत्संग क्रीडा मंडळ आयोजित भाजप चषक 2020 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत एम. सी. सी. चोरढे संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तर द्वितीय सत्संग येसदे, तृतीय यंगस्टार कोर्लई, चतुर्थ क्रमांक नूतन चेहेर व शिस्तबद्ध संघ बक्षीस शईनस्टार मिठेखार यांनी पटकावले. स्पर्धेत मॅन …
Read More »ताम्हीणी घाटातील भीषण अपघातात पुण्याचे तिघे ठार
माणगाव ः प्रतिनिधी मित्राचा वाढदिवस व कोकणातील दिवेआगार येथे पर्यटनासाठी निघालेल्या आळंदी रोडजवळील पाच तरुणांच्या एर्टिगा कारचा गुरुवारी (दि. 20) पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ताम्हीणी घाटात भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार, तर दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगावले …
Read More »नागोठणे मीरानगरातील अतिक्रमणे वनखात्याकडून जमीनदोस्त
नागोठणे : प्रतिनिधी येथील मिरानगर भागातील वन खात्याच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण संबंधित विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि. 20) सकाळी जमीनदोस्त केली. कोकण रेल्वे मार्गाच्या पलिकडे नागोठणे ग्रामपंचायत अंतर्गत मिरानगर वसले आहे. येथील बहुतांशी जागा वन विभागाच्या मालकीची असली तरी, मागील तीस चाळीस वर्षांपासून काही भू माफियांच्या आशीर्वादाने याठिकाणी अतिक्रमणे फोफावली …
Read More »रायगडमध्ये गुटखाविक्री तेजीत
हरिश बेकावडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यामध्ये गुटखा विक्रीचा धंदा तेजीत असून, तो पुर्णत: नष्ट करण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिश बेकावडे यांनी पेणमधील शासकीय विश्रामगृहात घतलेल्या पत्रकार परिषदेत केला. जिल्ह्यात ठिकठिकाणी भाड्याने जागा घेवून मुंबईतील एक व्यक्ती तेथे गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची …
Read More »वृक्षतोडीत 14 पोपटांचा मृत्यू
खोपोलीतील पक्षीप्रेमींची कारवाईची मागणी खालापूर : प्रतिनिधी रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड करीत असताना गुरुवारी (दि. 20) खोपोलीतील हनुमान मंदिरासमोरील जांभळाच्या झाडावरील पोपटांच्या घरट्यांचे नुकसान झाले. या घटनेत पोपटांच्या 14 पिल्लांचा मृत्यू, तर आठ पिल्ले जखमी झाली. या पोपटांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा ठेकेदार व वृक्षतोड करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी …
Read More »कर्जत फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती
कर्जत : प्रतिनिधी कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बुधवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी शिवज्योत व पालखी मिरवणूक, शिवजन्म आणि सांस्कृतिक असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रायगड किल्ल्याची प्रतिकृतीही तयार केली होती. विशेष म्हणजे सुटी असूनही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय सुरू ठेवण्याची विंनती करून शिवजयंती साजरी केली. बुधवारी …
Read More »शिवरायांना अनोखी मानवंदना; स्वराज्याचे सुराज्य बनवू या..!
पायरीचीवाडीतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची प्रतिज्ञा पाली : प्रतिनिधी शिवजयंती निमित्ताने सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी बुधवारी ’चला स्वराज्याचे सुराज्य बनवूया, छत्रपतींचे स्वप्न साकार करूया’ अशी प्रतिज्ञा घेत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पायरीचीवाडी गावात शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक …
Read More »पोलादपूर तालुक्यात ‘केमिकल लोचा’
पोलादपूर तालुक्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी केलेले प्रयत्न सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समितीने हाणून पाडले होते. यानंतर ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत महाड औद्योगिक वसाहतीच्या तिसर्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, मात्र अद्याप त्याचा विधीवत समारंभपूर्वक फलक लागूनही शुभारंभ काही झाला नाही. पोलादपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वीच्या या …
Read More »