खालापूर : प्रतिनिधी आठ महिने उलटूनसुद्धा तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकारात मागितलेली कागदपत्रे मिळत नसल्याने खालापूर तालुक्यातील माजगावचे शेतकरी निराश झाले आहेत. दलालांसाठी महसूल विभागाकडून कागदपत्रे लगेच उपलब्ध होतात, मात्र शेतकर्यांची दखल घेतली जात नाही, भावना हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. खालापूर तालुक्यातील माजगाव येथील सुमारे पन्नास शेतकर्यांची दिडशे एकर जमीन …
Read More »शेतकर्यांवरील अन्याय दूर करणार -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
सातबार्यावरील चुकीच्या नोंदी काढून टाकण्याच्या महसूल विभागाला सूचना महाड : प्रतिनिधी बिरवाडी, काळीज, आमदशेत परिसरातील शेतजमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी अशी पेन्सिलने नोंद करण्यात आली आहे, प्रत्यक्षात तिचा वापर केला गेला नाही व शेतकर्यांना मोबदलाही दिला नाही. हा अन्याय असून, तो दूर करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संबंधीत …
Read More »अलिबागेत वैद्यकीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधीयेथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीला लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी कन्हैया सिंग याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय …
Read More »उमरठमध्ये समाधी वास्तूचे लोकार्पण
पोलादपूर : प्रतिनिधीराज्य शासन, रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी …
Read More »सुकापूरच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक पाटील
पनवेल ः सुकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे अशोक पाटील यांची बहुमताने निवड झाल्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, दत्ताशेठ भगत, सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद …
Read More »इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ विधान करायला नको होते -भाजप
मुंबई : प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात नवा वाद उफाळून आला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या वक्तव्यावरून वेगवेगळे मते मांडली जात आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्या वादविवाद भाजपानंही आपली भूमिका स्पष्ट केली …
Read More »उमरठच्या विकासाठी 100 कोटींची मागणी करणार -आ. प्रवीण दरेकर
महाड ः प्रतिनिधी : नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्वराज्यासाठी मोलाचे योगदान होते. त्यांचा त्याग आणि शौर्यगाथा जगामोर आणण्यासाठी उमरठ गावातील त्यांच्या स्मारकाचा पर्यटनाच्या धर्तीवर विकास होण्यासाठी आपण सरकारकडे 100 कोटींची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथीदिनी उमरठ …
Read More »शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मोडक
कर्जत : बातमीदार नेरळ गावाच्या वतीने गेली 55 वर्षे तिथीनुसार सार्वजनिक शिवजयंती साजरी केली जाते. या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन दीपक मोडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (दि. 16) येथील हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समितीचे मावळते अध्यक्ष संतोष शेळके यांनी मागील वर्षीच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा आलेख मांडला, …
Read More »‘विश्वसाहित्य’ सदस्यपदी प्रा. नन्नवरे
खोपोली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या ’विश्वसाहित्य’ प्रकल्पाच्या लेखन व समीक्षण कार्यात योगदान देण्यासाठी राज्य शासनाकडून खोपोलीतील केएमसी महाविद्यालयाचे प्रा. बी. एम. नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासनाचा बृहदप्रकल्प आहे. ज्ञाननिर्मिती व ज्ञानसंवर्धन या कार्यात विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून आत्तापर्यंत विश्वकोशाचे 20 …
Read More »‘सीएफआय’तर्फे हमरापूर येथे स्वच्छता अभियान; नागरिकांमध्ये जागृती
पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय, एम्पॉवर आणि हमरापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हमरापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण 120 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ.किशोर देशमुख यांनी प्लास्टिक आपल्यासाठी किती धोकादायक आहे याची सविस्तर माहिती दिली. आयबीएनच्या …
Read More »