अलिबाग ः प्रतिनिधी लायन्स क्लब पोयनाडच्या वतीने 20 गरजू, गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. हे सायकल वाटप जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, साहित्यिक-संपादक उमाजी केळुसकर, लायन्स क्लबचे झोन चेअरमन प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष मनीष अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स क्लब पोयनाड तळागाळातील …
Read More »पोशिर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
नेरळ ः बातमीदार कर्जत तालुक्यातील पोशिर येथे असलेल्या श्रमजीवी जनता विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत बालदिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची गोडी लागावी आणि ती वाढीस जावी यासाठी विज्ञान प्रदर्शन सर्व शाळांत आयोजित करावे, असे आवाहन कर्जत पंचायत समितीचे केंद्रप्रमुख कृष्णा पवार यांनी केले. श्रमजीवी जनता …
Read More »नगरपंचायतीला मिळेना पूर्ण वेळ मुख्याधिकारी
खालापुरात विकासकामे मंदावली; अतिरिक्त चार्ज खोपोली मुख्याधिकार्यांकडे खोपोली : प्रतिनिधी चार वर्षांत कौस्तुभ गव्हाणकर यांच्या रूपाने फक्त 18 महिनेच खालापूर नगर पंचायतीला पूर्ण वेळ मुख्याधिकारी प्राप्त झाला आहे. उर्वरित काळात या नगर पंचायतीचा कारभार अतिरिक्त चार्ज म्हणून खोपोलीच्या मुख्याधिकार्यांकडूनच चालविला जात आहे. त्यामुळे खालापूरला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, असा …
Read More »माणगाव स्फोटातील जखमी कामगारांपैकी दोघांचा मृत्यू
माणगाव : प्रतिनिधी विळे-भागाड औद्योगिक वसाहतीतील क्रिप्टझो कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात भाजलेल्या कामगारांपैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राकेश हळदे (वय 30, रा. रा. उंबर्डी, ता. माणगाव) आणि आशिष येरूणकर (रा. म्हसेवाडी, ता. माणगाव) अशी या दोघांची नावे आहेत. माणगाव तालुक्यातील क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी चारच्या सुमारास अचानक …
Read More »‘रायगडभूषण’ निवडीसाठी तज्ज्ञ समिती नेमणार
अलिबाग : प्रतिनिधी खिरापतीसारख्या देण्यात येणार्या रायगडभूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत भरविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय शुक्रवारी (दि. 15) झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आले. नियोजन भवन येथे ही सभा झाली. रायगडभूषण पुरस्कार एकाच व्यक्तीला दोनवेळा …
Read More »सात घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद
30 तोळे सोन्यासह चोरीची साधनेही जप्त कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017पासून घरफोड्या करणार्या एकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांतील घरफोड्यांचे एकूण सात गुन्हे उघड झाले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले तब्बल 30 तोळे सोनेदेखील नेरळ पोलिसांनी जप्त केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत …
Read More »मासेमारी करणार्या दोन गटांत भरसमुद्रात हाणामारी
अलिबाग : प्रतिनिधी एलईडीद्वारे मासेमारी करणारे आणि बुल नेट मासेमारी करणार्या आक्षी आणि बोडणीमधील मच्छीमारांच्या दोन गटांमध्ये समुद्रात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटांतील आठ जण जखमी झाले. जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूड तालुक्यातील कोर्लई समुद्रात ही घटना घडली. एलईडीमार्फत मासेमारी करणे हे कायद्याने …
Read More »निडी येथे रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान
रोहे ः प्रतिनिधी येथील रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने निडी रेल्वे फाटक येथे निरीक्षक सतीश विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे फाटक सुरक्षा जनजागृती अभियान रबविण्यात आले. रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर ते लगेचच उघडावे, असे प्रवासी गेटमेनला सांगतात. फाटक उघडले नाही तर गेटमेन व प्रवाशांत बाचाबाची होते. वास्तविक रेल्वेकडून सूचना आल्यानंतरच फाटक बंद …
Read More »दाखणे पूल बनलाय धोकादायक
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अनेक गावांना जोडणार्या दाखणे गावाजवळील पुलाची पडझड सुरू असून, तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या पुलावरून विद्यार्थी व ग्रामस्थांची ये-जा असते, मात्र हा पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा पूल तत्काळ नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. …
Read More »नुकसानभरपाई घेण्यात पोलादपुरातील शेतकर्यांचा निरुत्साह
बँक खाते क्रमांक देण्याचे तहसीलदार दीप्ती देसाई यांचे आवाहन पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या दोन- तीन वर्षातील धान पीक नुकसानभरपाईची रक्कम तहसील कार्यालयाद्वारे थेट बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकर्यांनी तातडीने त्यांचे बँक खाते क्रमांक आणि सामायिक शेती असल्यास सहमतीपत्र स्थानिक तलाठी अथवा तहसील …
Read More »