अलिबाग : प्रतिनिधी पेण येथे 12 व 13 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 16 दिव्यांग संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती समविचारी संघटनंचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिली. दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा रायगडला यजमानपद मिळाले …
Read More »‘रायगड’च्या पायथ्याशी पार्किंग समस्या
शैक्षणिक सहली आणि स्थानिक एसटी फेर्यांना अडथळा महाड : प्रतिनिधी महाडजवळील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या चित्तदरवाजा येथील अरुंद जागेमुळे गेल्या अनेक वर्षाचा पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. याठिकाणी बेजबाबदारपणे पार्किंग होत असल्याने किल्ले रायगडपासून पुढे जाणार्या एसटी बसला हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच …
Read More »साईबाबांच्या पालखीचे नागोठण्यातून शिर्डीकडे प्रस्थान
नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री साई सेवक मित्रमंडळाच्या नागोठणे ते शिर्डी दरम्यानच्या साई पालखी दिंडी सोहळ्यास बुधवार (दि. 11)पासून प्रारंभ करण्यात आला असून, ही पालखी 21 डिसेंबरला शिर्डीला पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता नागोठण्यातील श्री जोगेश्वरीमाता मंदिरातून पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी गवळआळीतील राधाकृष्ण- साईबाबा मंदिरात आली. तेथे पूजाअर्चा व …
Read More »क्लास चालकाला महाडमध्ये मारहाण
महाड : प्रतिनिधी शहरातील खाजगी क्लासचे चालक दिलीप पुरुषोत्तम कोटिया यांना विशाल खरोसे याने मारहाण करण्याची घटना सोमवारी (दि. 9) दुपारी घडली. दिलीप कोटिया यांनी क्लासची फी मागितली म्हणून त्यांना विशाल खरोसे याने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. महाड शहरातील सुबोध गांगण यांच्या दुकानासमोर सोमवारी दिलीप कोटिया यांनी विशाल खरोसे याच्याकडे …
Read More »लग्न समारंभातील खर्चिक बाबी कमी करा -शंकरराव भगत
रोहे ः प्रतिनिधी समाजात आजही काही ठिकाणी लग्न कार्यात मोठा खर्च केला जातो. समाजातील सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. आता या पुढे समाज बांधवानी लग्न कार्य एका दिवसात उरकुन समाजात चांगला आदर्श ठेवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबई प्रतिनिधी शंकरराव भगत यांनी रविवारी (दि. 8) धाटाव …
Read More »हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
सासरच्या चौघांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्या बीड येथील पती, सासू, सासरे आणि दिराविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत शहरातील बीएमएसपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणीचा 20 नोव्हेंबर 2017 मध्ये बीड जिल्ह्यातील विशाल जायभाये या तरुणबरोबर विवाह झाला. …
Read More »मोकाट गुरे अन् कुत्र्यांचा उच्छाद
म्हसळा नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचे ताशेरे म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केले असून, मागील 15 ते 20 दिवसात शहरात कुत्रा चावण्याच्या 10 ते 15 घटना घडल्या. त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालयात व माणगाव येथे उपचार करण्यात आले. म्हसळ्यातील रस्त्यावर खेळणार्या मुलांवर भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण …
Read More »रायगडातील सात पं. स.ची सभापतिपदे महिलांसाठी राखीव
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 15 तालुका पंचायत समित्यांपैकी सात ठिकाणचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. माणगावाचे सभापतिपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे, परंतु येथे अनुसूचित जातीचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. त्यामुळे हे पद रिक्त राहू शकते. सभापतिपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि. 9) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सोडतीचे …
Read More »बँक खातेदाराची फसवणूक करून 14 हजार रुपये लंपास
पेण : प्रतिनिधी पेण फणसडोंगरी येथील एका बँकेच्या खातेदाराची अज्ञात इसमाने फसवणूक करून त्याच्या खात्यातून 14 हजार रुपये लंपास केले. सोमवारी (दि. 9) सकाळी 10.30 च्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईल नंबरवरुन कॉल करुन बँक खातेदाराच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्याच्या बँकेचा एटीएम कार्ड पिनकोड नंबर व ओटीपी नंबर मागून घेतला. व …
Read More »नेरळचे उपसरपंच शंकर घोडविंदे यांचा सत्कार
कर्जत : नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर निवडून आल्याबद्दल शंकर घोडविंदे यांचा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपसरपंच शंकर घोडविंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष प्रवीण …
Read More »