Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भटक्या कुत्र्यांच्या त्रास वाढला; कर्जतमधील नागरिक वैतागले

कर्जत : बातमीदार शहरात मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाने  कर्जतमधील नागरिकांच्या त्रासात भर पडली पासून नगरपालिका प्रशासन मात्र याबाबत ढिम्म असल्याचे चित्र आहे. कर्जत शहराच्या हद्दीमध्ये अन्य शहरातील कुत्रे आणून सोडले जातात, अशी ओरड नेहमी होत असते. मग ते …

Read More »

आरक्षणामुळे दिग्गजांचा अपेक्षाभंग, जि.प. अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव

अलिबाग : प्रतिनिधी पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी रायगड जिल्हा परिषदेचे (राजिप)  अध्यक्षपद  अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचा अपेक्षा भंग झाला आहे.  सध्याच्या सदस्यांमध्ये शेकापच्या दोन, शिवसेना व काँग्रेस यांच्या प्रत्येकी एक अशा चार अनुसूचित जाती महिला सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणूकीत …

Read More »

क्रिपझो कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी …

Read More »

अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात

पेणमध्ये पाच जण अटकेत पेण : प्रतिनिधी सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांवर लाइव्ह व्हिडीओ करण्याची के्रझ तरुणाईमध्ये हल्ली वाढत आहे. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करणे पेणमधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी या तरुणांना अटक केली आहे. पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील …

Read More »

‘त्या’ अपघातातील दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

पोलादपूर ः प्रतिनिधी शनिवारी दुपारी पोलादपूरनजीक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्‍या अ‍ॅक्टिवा स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दोघे भाऊ जखमी झाले. त्यापैकी स्कूटरस्वाराचा महाड येथे मृत्यू झाल्याने खडपी गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. …

Read More »

महड येथे बँकेत आग; मोठे नुकसान टळले

खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील महड गावात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संध्याकाळी शार्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत संगणक तसेच फर्निचर जळाले असून बँक बंद असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार घङला नाही. आग तातङीने विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. महड भक्त निवासाच्या इमारतीत बँकेची शाखा असून शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या …

Read More »

किरवली ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना धनादेश वाटप

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील 21 दिव्यांग बांधवांसाठी आपल्या पाच टक्के निधीतून 50 टक्के अपंग असणार्‍यांसाठी चार हजार व  50 टक्केवरील अपंगत्व असणार्‍या बांधवांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सहाय्य करण्यात आले. गुरुवारी सकाळी 11 वाजता किरवली ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक बैठकीत किरवली ग्रामपंचायत हद्दीतील किरवली, देऊळवाडी, …

Read More »

नागाव बीच झाला चकाचक

ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले श्रमदान रेवदंडा ः प्रतिनिधी नागाव ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमातून अलिबाग वनखात्याच्या सहकार्याने नागाव समुद्रकिनारी व सुरूबन स्वच्छता अभियान नागाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून संपन्न झाले. शनिवारी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने नागाव समुद्रकिनारी व सुरू बनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य …

Read More »

भात वाहतूक धोकादायक

महामार्गावर अपघातांची भीती पोलादपूर ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून उघड्या ट्रकमधून होणारी भात वाहतूक भाताचे कण हवेसोबत डोळ्यांत शिरत असल्याने अन्य वाहनांसाठी धोकादायक ठरत असल्याचे दृश्य दरवर्षीप्रमाणे दिसू लागले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डायव्हर्शन रोड अस्तित्वात आले आहेत. भातपिकाच्या कापणीनंतर मळणी-झोडणीची प्रक्रिया …

Read More »

मुरूड-काशिदमध्ये पर्यटकांची गर्दी

मुरूड ः प्रतिनिधी शनिवार-रविवारच्या सुटीचे औचित्य साधून पर्यटकांनी मोठी गर्दी काशिद व मुरूड समुद्रकिनारी केली होती. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे येथील पर्यटन मोसम थंडावला होता, परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस नाहीसा होऊन स्वच्छ सूर्यप्रकाश पडू लागल्याने पर्यटकांनी पुन्हा समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत. मुरूड व काशिद येथील समुद्रकिनारी मोठ्या …

Read More »