सिद्धार्थनगरात चार लहान मुले जखमी खालापूर : प्रतिनिधी खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असून, सिद्धार्थनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक लहान मुलांना चावा घेत जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर घटनेकडे नगर परिषद लक्ष देत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. खोपोलीतील सर्वच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा …
Read More »मुरूडमध्ये सापाला जीवदान
मुरूड : प्रतिनिधी शहरातील साईबाबा मंदिर परिसरात सोमवारी (दि. 11)सकाळच्या सुमारास घोणस जातीचा सव्वाचार फुट लांबीचा विषारी साप रहिवाशांच्या निदर्शनास आला. रुपेश पाटील या युवकाने सर्पमित्र संदीप घरत यांना पाचारण केले. घरत यांनी या विषारी सापाला शिताफीने पकडून गोणपाटात बंदीस्त केले आणि वनखात्याचे अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गारंबीच्या जंगलात …
Read More »कर्जत तालुक्यात त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात, डोलकाठीचे भाविकांना आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली – देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. त्याचे आकर्षण भाविकांना असते यंदासुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर ठेऊन नाचविली. नवसाला पावणार्या …
Read More »पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा; नागरिक, भाविकांची कुचंबणा
पाली : प्रतिनिधी पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे, तसेच धार्मिक स्थळदेखील आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक खरेदी, शासकीय कामे करण्यासाठी तसेच विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी, रुग्ण दवाखान्यासाठी पालीत येतात. तीर्थक्षेत्र असल्याने पालीत भाविकांचा राबतादेखील नियमित असतो. मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने विशेषत: महिलांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालीत महत्वाच्या ठिकाणी …
Read More »देव होण्याचा प्रयत्न करा -इंदुरीकर महाराज
कर्जत : प्रतिनिधी जगात सर्वात पवित्र गोष्ट म्हणजे ज्ञान, आई-बापाची सेवा जो करतो त्याने देवाला गेलेच पाहिजे असे नाही. स्वतःचा धर्म पाळणे हीच देवाची पूजा. देव पाहू नका देव होण्याचा प्रयत्न करा, असे मार्गदर्शन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून येथे केले. कर्जत तालुक्यातील हलीवली येथील भैरवनाथ मंदिरामधील काकड …
Read More »शिहूत सांडपाण्यामुळे भातशेती धोक्यात; शेतकर्यांचा आरोप
नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीतून धरमतर खाडीकडे सांडपाणी वाहून नेणार्या पाईपलाईनला शिहू ग्रामपंचायत हद्दीतील आटीवली, गांधे भागात गळती लागली असल्याने काहीअंशी हातात आलेली भातशेती नष्ट होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत रिलायन्स कंपनीच्या एका जबाबदार अधिकार्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनी न उचलल्याचे कंपनीकडून कोणत्याही प्रकारची …
Read More »खोपोलीत आरोग्यसेवेचे तीन तेरा, रुग्णालयात सुविधा निर्माण होण्यासाठी स्वाक्षरी मोहीम
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात आवश्यक सोयी सुविधा व रुग्णालय अद्यावत होण्यासाठी आत्ता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. नगरपालिका व संबंधित व्यवस्थेवर दबाव वाढविण्यासाठी शहरातील नागरिकांना बरोबर घेण्यात येणार असून, त्यासाठी स्वाक्षरी मोहीम ही सुरू होणार आहे. खोपोली नगरपालिका रुग्णालयात मागील काही दिवसांपासून विविध गैरसुविधा …
Read More »साजगावच्या जत्रेत पेणची सुकी मच्छी
पेण : प्रतिनिधी खोपोली जवळील साजगाव येथे सुरु झालेल्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत पेण कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी सुक्या मच्छीची दुकाने थाटली असून, या दुकानांतील पेणच्या सुक्या मच्छीला वाढती मागणी आहे. ‘धाकटीपंढरी’ म्हणून ओळख असलेल्या विठोबा मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून यात्रेला सुरुवात झाली असून, ती पंधरा दिवस चालणार आहे. या जत्रेत सुकीमच्छीचा …
Read More »एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
खालापूर : प्रतिनिधी सावरोली – खारपाडा मार्गावर धामणीनजीक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून, चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य …
Read More »कर्जत तालुक्यातील सहा शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सहा प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षक सेना या संघटनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेलू, बेडीसगाव, आधारवाडी, चिकनपाडा, माले आणि पाषाणे येथील प्राथमिक शाळांंमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, …
Read More »