Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वरंध घाटातून वाहनचालकांचा धोकादायक प्रवास

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूचनेनंतरही वाहतूक सुरूच महाड : प्रतिनिधी ऐन पावसाळ्यात महाड -भोर-पुणे मार्गावर जागोजागी दरडी आणि मातीचा भराव आला आहे, तसेच वरंध आणि भोर हद्दीत काही ठिकाणी मार्ग खचला आहे. यामुळे हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केला असला तरी गेल्या दोन दिवसांपासून या खचलेल्या भागातून धोकादायक प्रवास केला …

Read More »

माथेरानकरांचा रेल रोको स्थगित

कर्जत : बातमीदार माथेरानची मिनीट्रेन बंद असून, ती सुरू करण्यासंदर्भात माथेरानकरांनी नेरळ येथे मेन लाइनवर सोमवारी (दि. 14) रेल रोको आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता, मात्र मध्य रेल्वेचे डीआरएम व खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची घोषणा येथील श्रीराम मंदिर येथे छोटेखानी सभा घेऊन करण्यात …

Read More »

रविशेठ पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होतील

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा विश्वास; पेणमध्ये रॅली पेण ़: प्रतिनिधी महायुतीचे पेण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रविशेठ पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून, त्यांना मिळणारा शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रविशेठ पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी रविवारी (दि. 13) व्यक्त …

Read More »

श्रीवर्धनच्या विकासासाठी महायुतीला निवडून द्या

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन; विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ माणगावमध्ये जाहीर सभा माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी (दि. 12) संध्याकाळी माणगाव तालुक्यातील पेण तर्फे तळे येथे केले. विधानसभेच्या श्रीवर्धन मतदारसंघातील महायुतीचे …

Read More »

विशेष लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती; कर्नाळा बँक गैरव्यवहार

अलिबाग : प्रतिनिधी कर्नाळा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची दखल प्रशासकीय पातळीवर घेण्यात आली असून, बँकेच्या विशेष लेखापरीक्षणासाठी जिल्हा विशेष लेखापरीक्षक, वर्ग 1, सहकारी संस्था, रायगड-अलिबागचे यू. जी. तुपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेखापरीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकरच कर्नाळा बँकेच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत आढळलेल्या कर्नाळा …

Read More »

निवडणुकीच्या वणव्यात तटकरे होरपळून जातील -अनंत गीते

रोहे ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या दिशेने वारे वाहत आहेत. आता निवडणुकीचे रण पेटले असून त्याचा वणवा होईल. या वणव्यात सुनील तटकरे होरपळून जातील आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी (दि. 12) येथे व्यक्त केला. शिवसेना, भाजप, …

Read More »

डिजिटल दिवाळी पर्व

‘साहित्यसंपदा’ची अभिनव कल्पना अलिबाग : रामप्रहर वृत्त मराठी संस्कृतीत दिवाळी एक चैतन्याचा सण. मराठी माणसाच्या मनात दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील यासह दिवाळी अंक असे समीकरण ठाम रअसते. दिवाळी विशेषांक नेहमीच आपले वेगळे असे स्थान साहित्यक्षेत्रात राखून आहेत. खूप आवडीने आणलेला विशेषांक नंतर कुठेतरी पडून राहतो आणि वर्षाच्या शेवटाला …

Read More »

विरोधकाला तिसर्यांदा पाणी पाजणार

आमदार भरत गोगावले यांचे निजामपूर गाव बैठकीत प्रतिपादन माणगाव : प्रतिनिधी महाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत बॅलेट मशीनवर आपले नाव एक नंबरवर आहे, तर प्रतिस्पर्धी काँगे्रस उमेदवाराचे नाव तीन नंबरवर आहे, त्यामुळे आपण त्यांना आता तिसर्‍यांदा पाणी पाजण्यासाठी सज्ज झालो आहोत, असे महायुतीचे उमेदवार आमदार भरत गोगावले यांनी निजामपूर विभागातील …

Read More »

मुंढाणीत कौटुंबिक वाद

परस्परांविरोधात गुन्हा दाखल नागोठणे : प्रतिनिधी घरगुती भांडणाचा राग धरून दोन्ही चुलत भाऊ तसेच त्यांच्या पत्नींनी एकमेकांना मारहाण तसेच धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची घटना विभागातील मुंढाणी गावात घडली असून दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढाणीतील प्रकाश रामदास घासे आणि सुरज सीताराम घासे …

Read More »

सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच रविशेठ पाटील यांचे कार्य -पूजा पाटील

पेण : प्रतिनिधी सब का साथ, सब का विकास, या भावनेतूनच आमचे नेते रविशेठ पाटील यांची कार्यप्रणाली असून, त्यांनी पेण तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन वढाव सरपंच पूजा पाटील यांनी केले. भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यासाठी पेण तालुक्यातील वढाव …

Read More »