Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये बदल नक्की -दत्ता दळवी

कर्जत : बातमीदार कर्जत विधानसभा मतदारसंघात आपला हक्काचा आमदार निवडून आणण्यासाठी जनतेनेच बदलाची सुरुवात केली असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे …

Read More »

पोलादपुरात काँग्रेसला घरघर

उपसरपंचांसह लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्ते शिवसेनेत पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये भूलथापा दिल्या जात असल्याचा अनुभव आल्याने अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून कोतवाल बुद्रुकच्या महिला उपसरपंच आणि कार्यकर्ते तसेच लोहारे आदिवासीवाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार भरत गोगावले यांच्या महाड येथील शिवनेरी निवासस्थानी …

Read More »

बालसंरक्षण कक्षातर्फे मतदार जनजागृती

कर्जत : प्रतिनिधी जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने कर्जत शहरात शुक्रवारी (दि. 11) मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात नागरिकही सहभागी झाले होते. जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण कक्ष कर्जत येथील संरक्षण अधिकारी डॉ. कालिदास शिंदे, राम म्हस्के, सुजाता सपकाळ, …

Read More »

विकासासाठी रविशेठच पाहिजेत -कोकरे

नागोठणे : प्रतिनिधी कुटील राजकारणात रविशेठ पाटील यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला होता व त्यामुळे नागोठणे विभागातील विकासाची गंगा मागील 10 वर्षांपासून ठप्पच झाली आहे. भाजपने रविशेठ यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांना खर्‍या अर्थाने न्याय दिला असून, आता नागोठण्याच्या विकासाची दारे पुन्हा एकदा खुली होणारच, असा ठाम विश्वास भाजपचे …

Read More »

तटकरेंना भाजप, शिवसेनेने झिडकारले

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा गौप्यस्फोट, श्रीवर्धन येथे महायुतीची जाहीर सभा श्रीवर्धन : प्रतिनिधी  सुनील तटकरे सुरुवातीला पक्षप्रवेशासाठी भाजप श्रेष्ठींकडे गेले होते, परंतु त्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक असलेला आम्हाला नको, असे सांगितले. मग मातोश्रीवर गेले आणि म्हणाले की, आम्हाला शिवसेनेत प्रवेश आणि आदितीला श्रीवर्धनमधून उमेदवारी द्या. त्या ठिकाणी मी त्यांना …

Read More »

विधानसभेचा सामना एकतर्फी होणार : मुख्यमंत्री निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नसल्याचा टोला

पेण : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सामना एकतर्फी होणार असून, निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे विरोधकांना फटकारले. या वेळी त्यांनी माजी मंत्री व पेणमधील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित विराट जनसमुदायाला केले. या सभेला …

Read More »

फसवेगिरी करणार्या शेकापची विकेट जनताच काढणार! आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघात

अलिबाग : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्‍यांनी अलिबागच्या जनतेला वर्षानुवर्षे फसविले आहे. सत्ताधार्‍यांना डबे पोहचवून त्यांनी स्वतःचा विकास केला. जनतेसाठी काहीच केले नाही. जनता आता शहाणी झाली आहे. आता ती फसणार नाही. या वेळी जनता मतदानातून शेकापची विकेट काढणार, असा घणाघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

डॉक्टर तरुणीचा लग्नाच्या खरेदीवरून येताना अपघात

भिवंडी : प्रतिनिधी वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तील दुगाडफाटा येथे घडली आहे. नेहा आलमगीर शेख (23 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला लग्न होणार होते. नेहा लग्नाच्या खरेदीसाठी भावासोबत ठाण्याला गेली होती. …

Read More »

कुलाबा किल्ल्यातील तोफगाड्याची मोडतोड; अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यात बसविण्यात आलेल्या सागवानी तोफगाड्याची अज्ञाताने तोडफोड केली असल्याची तक्रार सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे अलिबाग पोलीस ठाणे आणि पुरातत्त्व विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. कुलाबा किल्ल्यात तीन तोफा जमिनीवर पडल्या होत्या. त्या तोफांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने लाकडी गाडे दिले होते. या तोफगाड्यांचा लोकार्पण सोहळा 20 जानेवारी रोजी रघुजीराजे …

Read More »

महाडमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समितीकडून अभिवादन महाड : प्रतिनिधी महाड क्रांतिभूमीत मंगळवारी (दि. 8) धम्मचक्र प्रवर्तन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाडमध्ये मंगळवारी भारतीय बौद्ध महासभेमार्फत अभिवादन कार्यक्रम …

Read More »