कर्जत : बातमीदार येथील रोटरी क्लबचे अध्यक्ष म्हणून हुसेन जमाली यांची निवड करण्यात आली. कर्जतच्या सीबीसी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हुसेन जमाली व क्लबच्या नवीन पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. पदग्रहण सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सुरुवातीस मावळते अध्यक्ष रामदास घरत यांच्याकडून हुसेन जमाली यांनी रोटरी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. …
Read More »डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयात युवा माहितीदूत कार्यक्रम
रोहा ः प्रतिनिधी कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात सोमवारी (दि. 22) युवा माहितीदूत हे अॅप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. युवा माहितीदूत अॅपमध्ये राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आहे. युवकांना माहितीदूत म्हणून काम करण्यासाठी हे अॅप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक कांतीलाल पाटील यांनी या वेळी केले. …
Read More »पाली बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवासी त्रस्त
पाली : प्रतिनिधी परिवहन महामंडळाचे पाली (ता. सुधागड) येथील बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. धोकादायक इमारत दुरुस्तीचा प्रश्न सतावत असतानाच पावसाळ्यात बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बसस्थानकात येणार्या-जाणार्या प्रवासी-विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिक करीत आहेत. पाली …
Read More »पावसाचे पुनरागमन
रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (दि. 24) पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर धुवाँधार …
Read More »शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करा ः पालकमंत्री
अलिबाग ः जिमाका अलिबाग तालुक्यातील विकासकामांबाबत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे, …
Read More »कृतज्ञ राहिलात तर सुख-समाधान लाभेल -प्रल्हाद पै
कडाव ः वार्ताहर आपल्याला प्रत्येकात व प्रत्येक गोष्टीत चांगले पाहता आले पाहिजे, तसेच आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान वाटले पाहिजे, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी कृतज्ञता सोहळ्यात संबोधित करताना केले. कृतज्ञ राहिलात तर आयुष्यात सुख-समाधान लाभेल. वस्तू, वास्तू, वस्तुस्थिती व नाती याबद्दल आपणास कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे अनमोल …
Read More »‘रविशेठना निवडून आणणे काळाची गरज’
Exif_JPEG_420 नागोठणे ः प्रतिनिधी विकासाचा ध्यास असणार्या रविशेठ पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला पराभूत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न चालला आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. रविशेठना निवडून आणणे काळाची गरज असून हेवेदावे विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन मारुती देवरे …
Read More »भांडीवलीत अवैध खैराची वाहतूक
बोलेरो पिकअप वन विभागाकडून जप्त माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली बोलेरो पिकअप क्रमांक (एम.एच.-06-बी डब्लू-2207) ही गाडी पकडण्यात आली असून ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी 7.15ला घडली. वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे …
Read More »रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहतीची दुरवस्था
रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहत दुरवस्थेत असून अवघ्या 32 वर्षांत इमारत पडीक झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते. रेवदंडा पोलीस ठाणेनजीकच सन 1987 साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षांत रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारीवर्गाने राहण्यासाठी उपभोग घेतला, परंतु कालांतराने या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी …
Read More »उमरोलीत डासांचा त्रास
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रापंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून डासांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. …
Read More »