कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रापंचायत हद्दीत अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणूनदेखील याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून डासांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. …
Read More »सुधागडला पावसाने झोडपले
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्याला सलग चार दिवस पावसाने चांगलेच झोडपले. परिणामी मुसळधार पर्जन्यवृष्टीने जनजीवन विस्कळीत केले आहे. अशातच मंगळवारी (दि. 23) रात्रीपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने सकाळी पाली, जांभूळपाड्यासह सुधागडात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. सलग कोसळणार्या पावसामुळे 1989च्या प्रलयकारी महापुराच्या आठवणी …
Read More »महाडमध्ये भाजपला पोषक वातावरण
शत प्रतिशत भाजप या वाक्याचा प्रत्यय आज देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक मतदारसंघात येत आहे. एकेकाळी लोकसभेत केवळ दोन खासदार असलेला भाजप पक्ष 2014 आणि 2019मध्ये एक मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून समोर आला आहे. दोनवरून 340 खासदार आणि जगात सर्वांत जास्त सदस्य असलेला भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. …
Read More »जांभूळपाडा महापुराला 30 वर्षे
ग्रामस्थांची मृतांना श्रद्धांजली सुधागड-पाली ः रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा अंबा नदीला दि. 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला. या महापुराला मंगळवारी (दि. 23) 30 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील स्मृतिस्तंभाजवळ सर्व नागरिक व मान्यवरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या महापुरात अनेकांनी आपली बायको, मुले, भाऊ, बहिणी, भाचा अशी …
Read More »खालापुरात कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन ः मनीष खवळे
खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील कंपन्या व मोठ्या उद्योगात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. उलट कंपन्यांकडून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले. दुसरीकडे वर्तमान स्थितीत कंपन्यांकडून विस्तारासाठी खुलेआम नियमबाह्य बांधकामे, सर्रासपणे वृक्षतोड, डोंगर तोडून माती उत्खनन सुरू आहे. यासंदर्भात आपण संबंधित सर्व शासकीय अधिकारी …
Read More »आनंद शाळेत सर्प छायाचित्र प्रदर्शन
खोपोली ः येथील आनंद शाळेत सर्प संवर्धन व त्यासंदर्भात वैज्ञानिक माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी यासाठी छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. सर्प संवर्धन व प्रोटेक्शन या निसर्ग संस्थेतर्फे हे सर्प छायाचित्र प्रदर्शन आयाजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही या वेळी विशेष उपस्थिती दर्शवली. या वेळी विद्यार्थांची सापांच्या कृष्णधवल छायाचित्रावरून साप …
Read More »पाली प्रवेशद्वाराची अर्धवट कमान धोकादायक
पाली ः रामप्रहर वृत्त पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाली गावाजवळ असलेल्या अधर्वट अवस्थेत असलेली कमानीच्या सळया उघड्या पडल्या असून ही कमान रस्त्यावर कोसळण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पाली ग्रामपंचायतीने किंवा ज्या विभागाच्या अखत्यारित या कमानीची जबाबदारी येते त्यांनी कमानीचा अपघात होण्यापूर्वी पाडून टाकावी, अशी मागणी होत …
Read More »माथेरानमधील अंतर्गत रस्त्यासाठी 143 कोटींचा प्रस्ताव
कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. चार महिन्यात 200 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील भाग उताराचा असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी 143 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे. नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड …
Read More »जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये गुरुपौर्णिमा ; वामनराव पै यांचे हजारो अनुयायी उपस्थित
कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी टाटा कॅम्प परिसरात चार वर्षांपूर्वी सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या जीवनविद्या मिशनचे ज्ञानपीठ उभे केले. या ठिकाणी सलग आठवडाभर गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. जीवनविद्या मिशनमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या या कृतज्ञता महोत्सवास सद्गुरूंचे हजारो अनुयायी भेट देत आहेत. कर्जतच्या वैजनाथ येथे असलेल्या जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये सद्गुरू वामनराव …
Read More »नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप
नागोठणे : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थीच शिकत असल्याने आमची संघटना त्यांना दरवर्षी शालोपयोगी साहित्याचे वाटप करीत असते. या विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असून, त्या भागविण्यासाठी येथील बँका तसेच सेवाभावी संघटना, पतसंस्था, नोंदणीकृत मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले. नागोठणे ज्येष्ठ नागरिक …
Read More »