Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कबड्डीपटू नीता धुमाळ यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी  रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या माजी व्यवस्थापिका नीता दिलीप धुमाळ यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधान झाले. त्या 52 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सून असा परिवार आहे.  नीता धुमाळ रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खानाव केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी रायगड जिल्हा महिला कबड्डी संघाच्या …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

कर्जत ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील  मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या नोव्हेंबर 2019मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 जागांकरिता आरक्षण काढण्यात आले आहे. नेरळमध्ये 10 आदिवासी वाड्या असून त्या वाड्या ज्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी तीन जागांपैकी एकही जागेवर आदिवासी समाजासाठी आरक्षण नाही. दरम्यान, यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा …

Read More »

‘मेंदडीत डेंग्यूची लागण नाही’

म्हसळा ः वार्ताहर तालुक्यातील मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील मेंदडीकोंड व परिसरातील काही रुग्णांना थंडी, ताप, सर्दी, उलटी, अंगदुखी होऊ लागल्याने तपासण्या केल्या असता रक्तातील फ्लेटलेटस् कमी आसल्याचे आढळले व रुग्ण डेंग्यूसदश्य रुग्ण आसल्याची भीती व्यक्त झाली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, येथे डेंग्यूची लागण नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तालुक्यातील …

Read More »

वरसे ग्रामपंचायत परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी

रोहे ः पतिनिधी रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत  पावसाळ्यात भुवनेश्वरमधील आदर्शनगर, गणेश नगर व वैभवनगरसह लगत असलेल्या नगरमध्ये नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी  येते या नगरमध्ये हे पाणी घुसत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी मोठ्या प्रमाणात येत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. हे पाणी मानवनिर्मित अडथळ्यामुळे म्हणजे बिल्डरांनी नैसर्गिक नाल्यावर …

Read More »

नेरळमध्ये रेशनचा काळाबाजार

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून कारवाई पनवेल ः बातमीदार तालुक्यात रेशनिंग दुकानदारांबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी असल्या तरी कारवाई नसल्याने काळाबाजार करणारांचे चांगलेच फावले होते. मात्र कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी या काळ्या बाजाराचे पितळ उघडे पाडले आहे. या काळाबाजाराचा पर्दाफाश झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी याची थेट दखल घेऊन या घोटाळेबाजांवर …

Read More »

पत्रकार सुरक्षा समितीच्या तालुकाक्षपदी निलेश मोने

सुधागड-पाली : प्रतिनिधी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र या संघटनेचे पनवेल तालुक्यातील पत्रकार निलेश मोने यांनी आपल्या सहकार्‍यांसह सक्रिय सहभाग घेऊन या संघटनेचे काम हाती घेतले आहे. पत्रकार सुरक्षा समिती पनवेल तालुकाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोने तर खालापूर तालुका सचिव साबीर शेख यांची पत्रकार विजय कडू व पत्रकार सुरक्षा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

श्री सदस्यांकडून पेणमध्ये 27 हजार रोपांची लागवड

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे स्वछतादूत पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी (दि. 7) पेण येथील श्री सदस्यांनी 27 हजार वृक्षांची लागवड तालुक्यातील  पिंपळगाव, सापोली येथे केली. यावेळी पेण वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील …

Read More »

नेरळ येथे घरावर झाड कोसळले

कर्जत ः बातमीदार नेरळ बाजारपेठ भागातील जमीन मालक आणि भाडेकरू यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे त्या जागेत असलेल्या एका घरावर पिंपळाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले. इमारत धोकादायक असल्याने त्या ठिकाणी कोणी राहत नव्हते. परिणामी घरातील साहित्य वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही. नेरळ बाजारपेठ भागात प्रफुल्ल ठक्कर हे राहत असून …

Read More »

भाजप मुरूड तालुका उपाध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या मुरुड तालुका उपाध्यक्षपदी उसरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणारे तरुण व उमदे कार्यकर्ते समीर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुरुड तालुका भाजप कार्यकारिणीच्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी तालुका …

Read More »

पोल्ट्रीची भिंत पडली

शेकडो पक्षी मृत्युमुखी; सुधागडात लाखो रुपयांचे नुकसान सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कुंभारशेत ग्रामपंचायत हद्दीतील बलाप येथे वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी बलाप येथील शेतकरी संदीप खरीवले या शेतकर्‍याच्या गावाशेजारी असणार्‍या शेतात पोल्ट्रीची शेड आहे. या शेडमध्ये सहा ते सात हजार कोंबड्या आहेत. या पोल्ट्री शेडची  भिंत पडल्याने यामध्ये  200 …

Read More »