Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानावरील बहिष्कार मागे

खोपोली : प्रतिनिधी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर …

Read More »

उमरोली, सावेळे प्रभागात युतीचे कार्यकर्ते सक्रीय

आपल्या बालेकिल्ल्यात आघाडी देणार कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सावेळे आणि उमरोली या जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे वर्चस्व असून या दोन्ही ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी …

Read More »

‘बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा’

‘आदित्य संवाद’ला तरुणाईचा मोठा प्रतिसाद खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीतदेखील सरस ठरले आहेत. बारणे यांना सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असून, मावळचा आवाज संसदेत उठविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पिंपरीतील डॉ. …

Read More »

वारे कुरुंग येथे आग

शेतकर्‍यांचा साठवण केलेला पेंढा, लाकडे जाळून खाक कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुंग येथील एका शेतकर्‍याने साठवण करून ठेवलेला पेंढा, गोवर्‍या आणि लाकडांना अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. कुरुंग गावातील शेतकरी रामचंद्र भोईर यांनी गावाबाहेरील आपल्या …

Read More »

एक्स्प्रेसमध्ये विसरलेला लॅपटॉप प्रवाशास परत

कर्जत रेल्वे पोलिसांची कामगिरी कर्जत : बातमीदार निजामुद्दीन-पुणे दर्शन या एक्स्प्रेस गाडीमध्ये एका प्रवाशाची लॅपटॉप असलेली बॅग विसरली होती. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कर्जत स्थानकात ती बॅग ताब्यात घेण्यात आली आणि त्या प्रवाशाला परत करण्यात आली. अंकीत सिंग सोमवंशी (रा. आजोठा, गुजरात) हे हजरत निजामुद्दीन-पुणे दर्शन एक्स्प्रेस या विशेष गाडीने कल्याण …

Read More »

बदलणार तरी कधी? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक झाल्या आहेत, याकडे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा जवळ आल्याने विज वितरण कंपनीने  विजेच्या तारा, …

Read More »

वरवणे आदिवासीवाडीवर हायजीन कीटचे वाटप

पेण : प्रतिनिधी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (सीएफआय) रायगड युनिटतर्फे पेण तालुक्यातील वरवणे आदिवासीवाडीवर शारीरिक व सार्वजनिक स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येऊन प्रतिपालीत व अप्रतिपालीत कुटुंबाना हायजिन कीटचे वाटप करण्यात आले. सीएफआय या सामाजिक संस्थेतर्फे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाहाचे साधन, निवारा व विविध समाजोपयोगी जनजागृती उपक्रम राबविले जातात. संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात वरवणे आदिवासी …

Read More »

रायगडात नऊ लाखांचा दारूसाठा हस्तगत

मतदानाच्या पूर्वसंध्येची घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या पूर्वसंध्येला व मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीला पूर्णपणे बंदी होती. या कालावधीत रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आठ लाख 81 हजार 132 रुपयांचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा …

Read More »

म्हावरा घटल्याने खवय्ये नाराज ; ताज्या मासळीचा भाव गगनाला

श्रीवर्धन : प्रतिनिधी खराब हवामानामुळे मागील काही दिवसांपासून खोल समुद्रात मासळी मिळेनासी झाली आहे. पाच ते सहा दिवसाची वस्ती करूनसुध्दा खोल समुद्रात पुरेशी मच्छी मिळत नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य भागातील मच्छिमारी नौका किनार्‍याला साकारलेल्या दिसत आहेत. त्यामुळे आवक घटून मच्छीचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे 1000ते 1200मच्छिमारी नैाका …

Read More »

विरोधक अफवा पसरवित आहेत -वैकुंठ पाटील

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदार संघात विरोधी पक्षाला पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 23) रावे (ता. पेण) गावातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला होता. तो डाव हाणून पाडण्याचे काम आम्ही केले. यावेळी आम्ही सयंम बाळगल्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र विरोधी पक्ष फक्त …

Read More »