कर्जत : विजय मांडे मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे सेनेचा अर्थात युतीचा बालेकिल्ला. 2009 मध्ये हा मतदार संघ अस्तित्वात आला आणि त्यांनतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे खासदार लोकसभेत गेले. मात्र पवार कुटुंबातील पार्थ यांच्या उमेदवारीमुळे यंदा या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असले तरी हा मतदार संघ म्हणजे …
Read More »रायगडच्या मतदारांवर ठरणार मावळचा खासदार
अलिबाग : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. रायगड जिल्ह्यातील 11 लाख 9 हजार 250 मतदार या मतदारसंघात आहेत. हेच मतदार मावळचा खासदार ठरवणार आहेत. या मतदारसंघात 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थपवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, …
Read More »महाडमध्ये फाशात अडकून बिबट्याच्या मृत्यू
महाड : प्रतिनिधी जंगलात डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील टोळ गाव परिसरात असलेल्या जंगल परिसरात समोर आली आहे. मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत एका तारेत अडकल्याचे आढळून आले. हा बिबट्या किमान चार दिवसांपूर्वी अडकून मृत झाल्याचा अंदाज आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर महाड वन …
Read More »मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (दि. 26) नेरळमध्ये संचलन करण्यात आले. सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच वातावरण उत्साही करण्यासाठी …
Read More »मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार
कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघामधील कर्जत विधासभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार असून, त्यातील सुमारे 45 हजार 840 नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षात झाली आहे. सोमवारी (दि. 29) होणार्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली. मावळ …
Read More »मतदानाचा हक्क बजावून सुटीचा आनंद लुटा ; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे पनवेल, उरण, कर्जतमधील मतदारांना आवाहन
अलिबाग : जिमाका सुटी परत परत येईल, पण मतदानाची संधी 5 वर्षानंतर येणारी आहे, त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावा, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पनवेल, उरण आणि कर्जतमधील मतदारांना केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत …
Read More »तुर्भे बुद्रुक येथील घराला आग
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील साळवी बौद्धवाडीतील एका घराला गुरुवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत घरातील चीजवस्तू व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. तुर्भे बुद्रुक साळवी बौद्धवाडी येथे विलास सुधाकर साळवी यांचे …
Read More »पांडापूरजवळ एसटीची टेम्पोला ठोकर बसून महिला ठार
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील पांडापूर गावाजवळ गुरूवारी (दि. 25) एसटी व टेम्पोची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पेण कोळीवाडा येथील महेश पाटील हे टेम्पोतून (एमएच-06, एजी-4445) डीजेचे सामान घेऊन मुंबई-गोवा मार्गावरून महाडच्या दिशेने निघाले होते. पांडापूर …
Read More »रोहा तालुक्यात पाणीटंचाई
टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाल्यानंतर रोहा तालुक्यात काही गावात पाणीटंचाई भासू लागली आहे. शहराजवळच असलेल्या धामणसई विभागातील मढाली खुर्द, वांदोली, वांदोली आदीवासीवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथील महिलांना दोन कि.मी. अंतरावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. या तिन्ही गावांना टँकरने …
Read More »सोलनपाडा पाझर तलावाने गाठला तळ
परिसरातील आठ नळपाणी योजना बंद, चिल्लार नदी कोरडी कर्जत : बातमीदार तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या पाझर तलावामधून खालच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाल्याने चिल्लार नदी कोरडी झाली असून, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे …
Read More »