Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

आप्पा बारणे यांना विक्रमी मताधिक्य द्या; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे मतदारांना आवाहन

खोपोली : प्रतिनिधी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन भाजपचे चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी थेरगावात प्रचारसभा झाली. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक निलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी …

Read More »

ए. के. शेख यांच्या ‘छंदाक्षरी’ला साहित्यरत्न पुरस्कार

अलिबाग : रामप्रहर वृत्त साहित्यसंपदा समूह अलिबाग या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘साहित्यरत्न पुरस्कार’ पनवेलचे ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या ‘छंदाक्षरी’ या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. मराठी गजलचे शास्त्र व तंत्र शिकण्यास उपयुक्त असणारा हा ग्रंथ अल्पावधीतच वाचकप्रिय ठरला आहे. त्याबरोबर रमेश धनावडे यांच्या ‘जीवन गाणे’, श्रीकांत पेटकर यांच्या  ‘कल्याण’ …

Read More »

गडब येथील काळंबादेवीची यात्रा उत्साहात

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले, तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणार्‍या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी पारंपरिक पद्धतीने देवीला अभ्यंगस्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर चांदीचा सुशोभित मुकुट, रंगीबेरंगी कपडे, सोन्याच्या अलंकारांनी देवी श्रृंगारली गेली, तर यात्रेत …

Read More »

इको कारला डंपरची धडक, पादचारी जखमी

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर गडब गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 22) सकाळी इको कारला मागून येणार्‍या डंपरने जोरदार धडक दिली. या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचारी वाहनाची ठोकर बसून, तो जखमी झाला आहे. सोमवारी सकाळी 8.30च्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून सोमवारी सकाळी इको कार (एमएच 06, बीई …

Read More »

माथेरान डम्पिंग ग्राऊंडवर यापुढे मुले खेळ खेळणार

मुख्याधिकारी रामदास कोकरे यांचा मनसुबा कर्जत : बातमीदार गेल्या दोन वर्षांमध्ये माथेरान स्वच्छ करण्यासाठी नगरपालिका वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरात आहे. प्लॅस्टिक, काच आणि पालापाचोळा याचे वर्गीकरण करून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी क्रशर मशीन, काचेच्या बाटल्यांची विक्री, व पालापाचोळ्याचे खत तयार करण्यास नगरपालिकेने सुरुवात …

Read More »

नागोठणे ग्रामदैवतांचा पालखी सोहळा

नागोठणे : प्रतिनिधी येथील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा 47 तासांनी पूर्ण झाला. शनिवारी मंदिरातून काढण्यात आलेली पालखी सोमवारी (दि. 22) सकाळी 9 वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास शनिवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता देवीचे …

Read More »

टॉवरच्या नावाखाली 97 हजारांची फसवणूक

पेण : प्रतिनिधी विम नेटवर्क कंपनीच्या माध्यमातून टॉवर बसविण्यात येणार असून, त्याची प्रोसेस फी म्हणून 97 हजार रुपये घेऊन, आरोपीने प्रत्यक्षात टॉवर न बसवता फिर्यादीची फसवणूक केली व  फिर्यादीने रक्कम परत मागितली असता त्यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि आरोपी यांची …

Read More »

सुधागडात अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार

2 आरोपी अटकेत 2 फरारी, पाली पोलीस ठाण्यात गुन्हा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील घोडपापड आदिवासीवाडीतील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यातील चारपैकी दोन आरोपींना पाली पोलिसांनी अटक केली असून, दोन आरोपी अद्याप फरारी आहेत. संबंधितांवर बलात्कार, पोस्को व अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले …

Read More »

महिला पाण्यासाठी डोंगर उतरून नदीवर

कर्जत गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई; 24 अंश तापमानात कोरड्या नदीमध्ये डवरे खोदले कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरिवली ग्रामपंचायत हद्दीतील गुडवणवाडीमध्ये मोठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील आदिवासी महिला डोंगर उतरून कोरड्या असलेल्या चिल्हार नदीपात्रात येत असून, तेथे डवरे खोदून त्या थेंब थेंब पाणी गोळा करतात. ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेचे पाणी …

Read More »

सोंडेवाडी आरोग्य शिबिरात कालबाह्य औषधांचे वाटप

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी (दि. 21) वनौषधी, संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान या  सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, मात्र ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे ग्रामस्थांच्या जागृतेमुळे उघड झाले, यामुळे पुढील …

Read More »