Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

अपघातानंतर खालापुरातील रस्ता दुभाजक पूर्ववत

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीत हॉटेल व ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक तोडल्यामुळे अपघाताची घटना घडली  असून, अपघातानंतर मात्र कंत्राटदाराने तातडीने  दुभाजक दुरूस्ती केली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर ते महडपर्यंत दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार करण्यात …

Read More »

पेणची मिठागरे लुप्त होण्याच्या मार्गावर

पेण : अनिस मनियार : तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील आगरी, कोळी लोकांचा पूर्वी मिठाच्या शेतीचा मूळ व्यवसाय होता. एकेकाळी कामगारांनी गजबजलेली येथील मिठागरे आता ओस पडली आहेत. पेण तालुक्यात 30 ते 40 मिठागरांतून आता जेमतेम 5 ते 6 आगारे शिल्लक राहिली आहेत. भविष्यात मिठागरांचा इतिहास पुसला जाणार आणि यापुढे शालेय जीवनात मिठागरे …

Read More »

बोडणी गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य

अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील बोडणी कोळीवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे पाण्यासाठी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लागलेली लांबचलांब  हंड्यांची रांग ही येथील पाणी टंचाईची तीव्रता दाखवित आहे.  अलिबाग तालुक्यातील बोडणी हे गाव समुद्रालगत आहे. चारशेहून अधिक लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्याची मुबलक सुविधा नाही. वाढत्या वस्तीला पुरेल इतके पाणी दररोज उपलब्ध होत …

Read More »

पाली पोलीस ठाणे आवारात पक्ष्यांचा किलबिलाट

धान्य, पाण्याची व्यवस्था जांभूळपाडा : प्रतिनिधी : रणरणत्या उन्हाचा फटका संपूर्ण जीवनसृष्टीलाच बसत आहे. तापमानात होणारी कमालीची वाढ प्राणिमात्रांच्या जीवनावर बेतत आहे, मात्र पाली (ता. सुधागड) पोलीस ठाण्याच्या आवारात पशूपक्ष्यांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पक्ष्यांसाठी झाडावर घरटीही बनविण्यात आली आहेत. त्यामुळे पाली पोलीस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत …

Read More »

कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण

धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा  विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांना हे धरण …

Read More »

कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांनी लावले टाळे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक 2 मेपासून सुरू करणार उपोषण कर्जत : बातमीदार : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 25) शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे …

Read More »

रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली

158 गावे, वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे  उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात 30 गावे आणि 128 वाड्यांमध्ये 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर …

Read More »

नेरळमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी

मतदार बारणेंना भरभरून मतदान करतील, किसन शिंदे यांचा विश्वास कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतीचे कार्यकर्ते पोहचत असून, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नेरळ गावात महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू असून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार शिवसेना संपर्कप्रमुख …

Read More »

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानावरील बहिष्कार मागे

खोपोली : प्रतिनिधी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर …

Read More »

उमरोली, सावेळे प्रभागात युतीचे कार्यकर्ते सक्रीय

आपल्या बालेकिल्ल्यात आघाडी देणार कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सावेळे आणि उमरोली या जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे वर्चस्व असून या दोन्ही ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी …

Read More »