Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

उमरोलीत कार पेटून बालकाचा होरपळून मृत्यू

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील उमरोली गावात एका चार वर्षीय बालकाचा बंद कारला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय उमेश बुंधाटे असे मृत बालकाचे नाव आहे. उमरोली येथे एमएच 02-एनए 5625 ही मारुती झेन कार गावातील रस्त्यावर तीन महिन्यांपासून उभी होती. या गाडीच्या काचा उघड्या असल्याने …

Read More »

पेझारी, श्रीगाव येथे शिवजयंती जल्लोषात

श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील पेझारी येथे शिवभक्त पेझारी यांच्या वतीने दि. 23 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजेच शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शिवभक्त पेझारी तर्फे व उपस्थित शिवभक्तांतर्फे आदरांजली वाहण्यात आली. रायगड किल्ल्यावरून पेटती मशाल (शिवज्योत)चे सकाळी 5 …

Read More »

श्रीसदस्यांच्या स्वच्छता अभियानाने स्मशानभूमी झाल्या चकाचक

जिल्ह्यात अनोख उपक्रम, सर्वस्तरातून कौतुक कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील श्रीसदस्यांनी हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण कर्जत तालुक्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविले. यात सुमारे 170 स्मशानभूमी स्वच्छता करण्यात आली असून यात सुमारे 30 टन …

Read More »

कर्जत तालुक्यात गावठी हातभट्टीच्या विरोधात कारवाई

कडाव : वार्ताहर : गावठी हातभट्टी दारूच्या विरोधात कर्जत पोलिसांनी मोहीम उघडली असून,  तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील कळंबोली गावामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त करून टाकला. हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची खबर तेथील स्थानिक आदिवासी महिलांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे यांना प्रत्यक्षात भेट घेऊन दिली. …

Read More »

पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा प्रचाराचा धडाका

पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांची नाराजी दूर करण्यात आ. भरत गोगावले यांना यश आले असून राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत ना. गीते यांच्या प्रचाराची धुळवड उडविण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Read More »

अनधिकृत विद्युत खांबाबाबत महावितरणाची उदासीनता

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत खांब अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या बेकायदेशीर कामाच्या परवानग्या व मान्यता आदेश रद्द करण्यात आलेले असताना अद्याप हे अनधिकृत धोकादायक खांब काढण्यात आलेले नाहीत. नेरळ-कळंब रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी वरई येथील एका गृहप्रकल्पास विद्युत पुरवठा करण्यासाठी …

Read More »

मिनी ट्रेनसाठी जुन्या इंजिनांना नवीन साज

कर्जत : बातमीदार नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनसाठी आणखी एक नवीन इंजीन नेरळ येथे दाखल झाले आहे. एनडीएम1 श्रेणीमधील 407 या क्रमांकाचे इंजीन नेरळ लोकोमध्ये पोहचले असून, या श्रेणीमधील मागील दोन वर्षांतील हे सलग आठवे इंजीन आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील कार्यशाळेत भारतीय रेल्वेच्या अभियंत्यांनी ही इंजिने बनविली आहेत. दरम्यान, माथेरानच्या राणीच्या …

Read More »

रायगडची पोलीस यंत्रणा होतेय स्मार्ट, आरोपींच्या ठशांचे होणार जतन

खोपोली : प्रतिनिधी पोलीस तपासाचा मुख्य भाग असलेले आरोपीच्या हाताचे बोट आता शाईमुक्त होणार असून पोलीस खातेदेखील स्मार्ट बनून अत्याधुनिक तंत्राचा वापर करत गुन्हेगारांचा माग घेणार आहे. रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांत ऑटोमेटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टीम (एम्बिस) ही संगणकीय कार्यप्रणाली   कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील साडेसहा लाख आरोपींच्या …

Read More »

तटकरेंवर भरवसा नाही, नाईलाज म्हणून पाठिंबा

मधुकर ठाकूर यांनी स्पष्ट केली भूमिका अलिबाग : प्रतिनिधी सुनील तटकरे यांच्यावर भरवसा नाही, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा सहकारी पक्ष असल्याने काळजावर दगड ठेवून नाईलाजास्तव तटकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी शनिवारी (दि. 23) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. लोकसभा निवडणुकीत …

Read More »

सोन्याची तस्करी; खालापुरात वृद्ध जेरबंद

खालापूर : प्रतिनिधी सोन्याची तस्करी करणार्‍या 75 वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी शनिवारी (दि. 23) पहाटे सापळा रचून खाजगी बसमधून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे 44 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. ते कोल्हापूरला नेण्यात येत होते. खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना खबर्‍याने, मुंबईहुन कोल्हापूरला जाणार्‍या एका खाजगी …

Read More »