म्हसळा : प्रतिनिधी निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करून योग्य नियोजन व आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी म्हसळा येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसळ्यातील अंजुमन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये निवडणूक कर्मचार्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात प्रविण पवार उपस्थितांना मार्गदर्शन …
Read More »घोटाळेबाज संचालकाच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबवा
संघर्ष समितीची मागणी, जिल्हाधिकार्यांना निवेदन पेण : प्रतिनिधी पेण अर्बंन बँक घोटाळा प्रकरणातील घोटाळेबाज संचालक पदाधिकार्यांच्या मालमत्तांचे बेकायदेशीर हस्तांतरण थांबविले जावे, अशी मागणी ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने जिल्हाधिकारी, तपास अधिकारी, पेण पोलीस, प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघर्ष समितीने सादर केल्येल्या निवेदनात म्हटले आहेत की, पेण अर्बंन बँकेच्या 758 कोटीच्या …
Read More »उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब ठेवावा -निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार
रायगड : जिमाका लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांना दिली. रायगड मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबधित काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक 9158719876 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले. निलांक कुमार यांनी नुकताच रायगड जिल्हाधिकारी …
Read More »नागोठण्यात शांतता समितीची बैठक
सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या काळातच विविध उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले. लोकसभा निवडणुकीचे मतदान 23 एप्रिलला होत असून त्याच दरम्यान, हनुमान जयंती, जोगेश्वरीमातेचा पालखी …
Read More »भ्रष्टाचारी तटकरेंना एक दिवस जेलची हवा खावी लागेल
अनंत गीते यांचे प्रतिपादन; चौल येथे जाहीर सभा रेवदंडा : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात स्वार्थासाठी आघाडी करण्यात आल्याचा आरोप करून सुनील तटकरे भ्रष्टाचारी असल्याने महायुतीस आव्हानाचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस रायगडमधून नामशेष करावयास निघालेल्या तटकरेंना जनता कधीच विसरणार नाहीच, परंतु 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणार्या तटकरेंना एक दिवस जेलची हवा …
Read More »कावळ्या बावळ्या खिंडीत जाग्या झाल्या पराक्रमाच्या आठवणी
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे अभिवादन मोहीम; शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण पाली : प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी येथील दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहीम आयोजित केली होती. या वेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे …
Read More »खोपोलीत फेरीवाले रस्त्यात
वाहतूक कोंडी बनली गंभीर; नागरिक हैराण खोपोली : प्रतिनिधी तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व शहरात शिस्त लावण्यासाठी फेरीवाले विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्याचा परिणाम होऊन खोपोली शहरातील समाज मंदिर रोड, मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रस्त्यावर फेरीवाले फिरकत नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी फुटली होती, …
Read More »धाबेवाडी-बांगरवाडीला विकसकाकडून पाणीपुरवठा
महसूल विभागाच्या अधिकार्यांच्या प्रयत्नांना यश; टंचाईवर मात कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील धाबेवाडी आणि बांगरवाडीमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खाजगी जमीन विकसकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. महसूल अधिकार्यांनी पाणीपुरवठा करण्याबाबत केलेली सूचना जमीन विकसकांनी मान्य केली असून शासनाचे ट्रँकर सुरू होईपर्यंत जमीन विकसक पाणीपुरवठा करणार …
Read More »शेकाप माझा कट्टर वैरी : रवीशेठ पाटील
नागोठणे : राजू भिसे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष हा माझा कट्टर वैरी असून, काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने शेकापशी आघाडी करण्याचा प्रयत्न करीत होते, त्याला माझा ठामपणे विरोध होता. त्यामुळेच मी काँग्रेस सोडून भाजपच्या विकास प्रवाहात सहभागी झालो, असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी ‘रामप्रहर’शी विशेष मुलाखत देताना …
Read More »नांदेड-पनवेल एक्स्प्रेस : दुपारच्या वेळी शटल करण्यास मेन्टेनन्सचा अडसर
कर्जत : प्रतिनिधी नांदेडहून पनवेलला सकाळी 9 वाजता येणारी एक्स्प्रेस गाडी संध्याकाळी 4च्या सुमारास पुन्हा नांदेडकडे निघते. या मधल्या 7 तासांत या गाडीची पनवेल-कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी केली असता या गाडीच्या रेग्युलर मेन्टेनन्ससाठी तीन तास लागतात, असे कारण देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नकार घंटा सुरू केल्याने …
Read More »