नागोठणे ः प्रतिनिधीराज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात झालेल्या समारंभात गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भरत प्रल्हाद गुरव यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 10 …
Read More »सुपर डायमंड मार्शल आर्टचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
नागोठणे ः प्रतिनिधीयेथील सुपर डायमंड मार्शल आर्टच्या खेळाडूंनी अलिबागेत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत फाईट आणि काता या प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करीत पदकांची लयलूट केली. स्पर्धेत नागोठण्याच्या संघातील अनिश पालकरला बेस्ट फायटर, तर सुमेध गायकवाड याला बेस्ट प्लेयर म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्व खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष धनंजय जगताप आणि प्रशिक्षक रोहन …
Read More »मूकबधिर टेबल टेनिसपटू कार्तिकची गरूडझेप!
पनवेल : रामप्रहर वृत्त : नवीन पनवेल येथील मूकबधिर असलेला टेबल टेनिसपटू कार्तिक पचेत्ती याने कोल्हापूर येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद मूकबधिर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले असून, चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. टेबल टेनिस या खेळात चपळाईबरोबर एकाग्रतेला खूप महत्त्व असते. त्याचबरोबर आवश्यक …
Read More »कबड्डीत शहापूर संघ विजेता
श्रीगाव : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथे गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रौढ गटाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नुकतीच रंगली. या स्पर्धेत शहापूरच्या म्हसोबा संघाने बाजी मारली. स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक श्री विठ्ठल कोपरपाडा, तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे श्री …
Read More »खालापूर वकील संघटनेचा क्रीडा महोत्सव
खोपोली ः प्रतिनिधीयेथील प्रख्यात वकील विकास म्हात्रे यांच्या प्रयत्नाने टाटा कंपनीच्या सायमाळ क्रीडांगणात क्रीडा महोत्सव साजरा झाला. या वेळी दिवाणी न्यायाधीश सोनपरी गाडे उर्फ ब्राह्मणे यांच्या हस्ते आणि दिवाणी न्यायाधीश विशाल धोंडगे, सरकारी वकील सतीश नाईक, श्री. ब्राह्मणे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यात आला. वकील न्यायाधीश व कर्मचारी …
Read More »जोकोव्हिच-फेडरर लढतीची पुन्हा पर्वणी
सिडनी : वृत्तसंस्थागतवर्षी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हे दोन सर्वोत्तम टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही नामांकित खेळांडूचा खेळ पाहणे म्हणजे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस पर्वणीच ठरणार आहे. विशेष …
Read More »भारताचा ‘सुपरहिट’मॅन विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या सामन्यात मालिकाही खिशात हॅमिल्टन : वृत्तसंस्थारोहित शर्माच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा थरारक विजय नोंदवत मालिकाही खिशात घातला. हिटमॅन रोहितने पाठोपाठ दोन षटकार मारून सामना गाजवला. तत्पूर्वी मोक्याच्या क्षणी मोहम्मद शमीने पहिल्या चेंडूवर षटकार जाऊनही नेटकी गोलंदाजी केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.भारताने दिलेल्या 180 धावांच्या …
Read More »रॉजर फेडररची उपांत्य फेरीत धडक
सिडनी : अनुभवी टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आपला अनुभव पणाला लावत फेडररने 28 वर्षीय टेनिस सँडग्रेनची झुंज 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3च्या फरकाने मोडून काढली. साडेतीन तास सुरू असलेल्या सामन्यात फेडररला विजयासाठी संघर्ष करावा लागला, पण अखेरीस त्याने ही किमया साधून …
Read More »किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; मुंबई उपनगर, ठाणे विजेते
अहमदनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने सलग दुसर्यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले. अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई …
Read More »भरत गुरव यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
नागोठणे : प्रतिनिधीराज्य क्रीडा व युवक क्रीडा संचालनालय, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार नागोठण्यातील भरत प्रल्हाद गुरव यांना जाहीर झाला आहे. यापूर्वी गुरव यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गुणवंत खेळाडू व रायगड जिल्हा परिषदेकडून रायगडभूषण पुरस्कार मिळाला आहे. क्रीडा क्षेत्रात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper