पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा लंडन ः वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यासाठी इंग्लंडने संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडच्या संघात दोन बदल करण्यात आले असून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लेच आणि यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेमध्ये भारताने 2-1ची आघाडी मिळवली असून मालिका अनिर्णित ठेवण्यासाठी …
Read More »जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अलिबागचा सचिन पाटील भारतीय संघात
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय शरीरसौष्ठव विश्व आता आगामी 12व्या जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होतोय. कोरोनाच्या संकटामुळे अनेकदा लांबणीवर पडलेली स्पर्धा येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात होत असून या स्पर्धेसाठी भारताचा 77 सदस्यीय चमू निवडण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्राच्या सचिन पाटील, सुजन पिळणकर, सुभाष पुजारीसारख्या तयारीतील …
Read More »पॅरालिम्पिकपटूंचे जल्लोषात स्वागत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केल्यानंतर नेमबाज अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांच्यासह भारतीय खेळाडूंची अखेरची तुकडी सोमवारी मायदेशी परतली. त्यांचे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांत विक्रमी कामगिरी करताना पाच सुवर्णपदकांसह एकूण 19 पदकांची कमाई केली.टोकियो …
Read More »टीम इंडिया सुसाऽऽट!
ऐतिहासिक विजयानंतर ‘डब्ल्यूटीसी’मध्ये अग्रस्थानी दुबई : वृत्तसंस्थाभारताने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसर्या हंगामात पाकिस्तानला मागे टाकले आहे. विराटसेनेकडे आता पहिल्या क्रमांकाची खुर्ची आहे. भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 157 धावांनी जिंकला. या संस्मरणीय विजयाच्या आधारावर भारताला 26 गुण आणि 54.17 अशी टक्केवारी मिळाली. यामुळे …
Read More »राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड
पुणे ः प्रतिनिधी इंदापूर (जि. पुणे) येथे नुकतीच 23 वर्षाखालील फ्री-स्टाईल निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धेत पैलवान सौरभ इगवे, सुरज कोकाटे, सौरभ पाटील, रविराज चव्हाण, प्रथमेश गुरव, सुरज शेख , बाळू बोडके, ओंकार …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद
कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’ पाली ः प्रतिनिधीमहाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ …
Read More »टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा खणखणीत ‘चौकार’
टोकियो ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरूच असून, शनिवारी (दि. 4) भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या खात्यात आता 17 पदके झाली आहेत.भारतासाठी शनिवार अतिशय खास दिवस ठरला. आधी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी पी 4 मिश्रित 50 …
Read More »शार्दुल ठाकूरचे जलद अर्धशतक; सेहवागला टाकले मागे
लंडन ः वृत्तसंस्था भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आला आहे. शार्दुलने 36 चेंडूत सात …
Read More »प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि …
Read More »जलतरणमध्ये सुयश जाधव अपात्र
बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी टोकियो : वृत्तसंस्था नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper