Breaking News

क्रीडा

प्रो कबड्डी लीग : प्रदीप नरवाल बनला ‘बिग बॉस’

मुंबई ः प्रतिनिधी ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगच्या (पीकेएल) आठव्या हंगामाच्या लिलावात इतिहास रचला आहे. तो पीकेएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला यूपी योद्धाने 1.65 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. पीकेएलच्या लिलावाच्या दुसर्‍या दिवशी ए श्रेणीतील खेळाडूंचा लिलाव करण्यात आला आणि प्रदीप नरवालचे नाव समोर …

Read More »

टोकियो पॅरालिम्पिक : भारताच्या सिंहराजला कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जमा झाली आहेत. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश …

Read More »

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डबल ‘सुवर्ण’धमाका

टोकियो ः भारतीय नेमबाज अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय भारताच्या योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये रौप्यपदक पटकाविले. दोन वेळचा सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझारियाने या वेळी भालाफेकमध्ये रौप्यपदकावर मोहोर उमटवली, तर सुंदरसिंग गुर्जरही कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदकांची संख्या …

Read More »

अवनी लेखराने रचला इतिहास; पॅरालिम्पिक नेमबाजीत भारताला पहिले सुवर्णपदक

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करीत आहेत. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी नेमबाजीत चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदक जिंकले. अवनीने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 249.6 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. …

Read More »

भारताच्या भाविनाची ऐतिहासिक कामगिरी; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्थाभारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण देशाला ही भेट दिली आहे.टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अंतिम फेरीत 34 वर्षीय भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या …

Read More »

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल

कर्णधार विराट कोहलीचे संकेत लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत मोठा पराभव होऊनही भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाच गोलंदाजांना खेळवण्याचे विधान केले आहे. असे असले तरी आता वेगवान गोलंदाजांच्या कामाचा ताण लक्षात घेऊन कोहलीने चौथ्या कसोटीत संघबदल करण्याचे संकेत दिले.सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कोहलीने संघात अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा विचार नाकारला. 2 सप्टेंबरपासून …

Read More »

भाविना पटेलची ‘रूपेरी’ कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिक टोकियो ः वृत्तसंस्थाभारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भाविनाने या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. अंतिम फेरीत भाविनाचा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगने 3-0 असा पराभव केला.टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी 34 वर्षीय भाविना भारताची पहिली खेळाडू ठरली …

Read More »

दुसर्‍या दिवसअखेर इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी

लंडन : वृत्तसंस्थाभारत-इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसर्‍या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केली, तर लीड्सवरील चाहत्यांना जो रूटच्या (121 धावा) शतकी खेळीने मंत्रमुग्ध केले. रूटने मालिकेतील तिसरे शतक साकारले, तर अखेरच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी पाच बळी मिळवत दिलासा दिला.रूटच्या शतकाव्यतिरिक्त डेव्हिड मलान (70), हसीब हमीद (68) आणि रॉरी …

Read More »

2021 च्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नाही : नीरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था2021मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला की, सतत सुरू असलेला प्रवास आणि या सगळ्यात माझी तब्येत ठीक नसल्याने मला ट्रेनिंग सुरू करता आली नाही, यामुळे मी आणि माझ्या टीमने 2021 चा स्पर्धांचा माझा सीझन इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे …

Read More »

यूपी सरकार होणार कुस्ती पुरस्कर्ते

लखनौ : वृत्तसंस्थाउत्तर प्रदेश सरकारकडून 2032च्या ऑलिम्पिकपर्यंत कुस्ती क्रीडा प्रकाराला पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा आणि कुस्तीपटूंना पाठबळ देण्यासाठी 170 कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी गुरुवारी दिली.ओदिशा सरकारने हॉकीला पुरस्कृत केले आहे. यातून प्रेरणा घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी …

Read More »