मुरूड ः प्रतिनिधीसलग तीन वेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक मिळवून मुरूडसह देशाचे नाव चमकवणारे कराटेपटू प्रसाद प्रकाश चौलकर आता राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेतचमकदार कामगिरी करून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गोवा येथे 26 ते 29 ऑगस्टदरम्यान होणार्या वाको इंडिया मास्टर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांनी राज्याच्या संघात निवड झाली आहे.कराटे खेळात …
Read More »जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानी
दुबई ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज आणि पाकिस्तान कसोटी मालिका 1-1ने बरोबरीत सुटली आहे. दुसर्या सामन्यात पाकिस्तानने विंडीजचा पराभव केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघ पहिल्या स्थानी आला आहे.यानंतर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. …
Read More »तालिबान्यांनी घेतली अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट
काबूल ः प्रतिनिधी तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची भेट घेतली. या वेळी तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनस हक्कानीने अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्व सदस्यांशी आणि हशमतुल्लाह शाहिदीसह निवड मंडळाशी चर्चा केली. या बैठकीला …
Read More »जोस बटलर आयपीएलबाहेर; राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का
जयपूर ः वृत्तसंस्था आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार्या 2021 हंगामाच्या दुसर्या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसर्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ …
Read More »प्रतिकूल वातावरणावर मात करून अमित खत्रीचे रूपेरी यश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमित खत्रीने जागतिक युवा (20 वर्षांखालील) अॅथलेटिक्स स्पर्धेमधील 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर हे स्पर्धेचे ठिकाण असल्यामुळे तेथील वातावरणाचा अमितच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. शर्यतीदरम्यान त्याला श्वासोच्छ्वासाचीही समस्या जाणवत होती, पण तरीही कारकीर्दीतील पहिल्याच …
Read More »‘आरसीबी’ने केले मोठे बदल; तीन नवे खेळाडू संघात होणार दाखल
बंगळुरू ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी-20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणार्या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम …
Read More »अमेरिकेत खेळण्यासाठी भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती; मनन शर्माचा भारतीय क्रिकेटला अलविदा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. चांगल्या संधींसाठी तो कॅलिफोर्नियाला जाणार आहे. माजी भारतीय खेळाडू अजय शर्मा यांचा मुलगा मनन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. 2017मध्ये दिल्लीत पदार्पण केल्यापासून मननने …
Read More »भारतात पुढील वर्षी फॉर्म्युला-4 शर्यतींचा थरार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विभागीय भारतीय अजिंक्यपद आणि फॉर्म्युला-4 भारतीय अजिंक्यपद शर्यती देशात आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने हिरवा कंदील दिला आहे. रेसिंग प्रमोशन्सतर्फे फेब्रुवारी 2022मध्ये भारतातील नवी दिल्ली, चेन्नई, कोईम्बतूर आणि हैदराबाद या शहरांत विभागीय अजिंक्यपद शर्यतींच्या आयोजनाची योजना आहे. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने प्रमाणित केलेल्या एफ 3 गाड्या या …
Read More »सिंधूच्या कोरियन प्रशिक्षकाला मोदींनी दिले आयोध्या भेटीचे आमंत्रण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचाही समावेश होता. या कार्यक्रमाला सिंधूसह तिचे दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क तेई-सँग यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी खेळाडू तसेच प्रशिक्षकांशीही संवाद साधला. या वेळी …
Read More »महिलांसाठी आयपीएलचे आयोजन करा -स्मृती मानधना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रतिभावान डावखुरी फलंदाज स्मृती मानधना सध्या इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत आहे. द हंड्रेडमध्ये तिने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. अशाच प्रकारची स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात यावी, याबाबत स्मृतीने तिचे मत मांडले आहे. महिलांसाठी सहा संघांमध्ये आयपीएल स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी स्मृतीने केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper