Breaking News

क्रीडा

सत्कार समारंभांमुळे निरज अस्वस्थ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राला गेल्या 13 ऑगस्टला आपल्या राज्य (हरयाणा) सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला हजर राहायचे होते, मात्र त्या वेळी ताप असल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता. हा समारंभ बुधवारी पुन्हा आयोजित करण्यात आला अन् नीरजने त्याला हजेरी लावली. भारतात दाखल झाल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार …

Read More »

…तर भारत तिसरी कसोटी सहज जिंकेल

लंडन : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना 25 ऑगस्टला सुरू होणार आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे भारताला तिसर्‍या कसोटीत या गोष्टीचा चांगलाच फायदा होऊ शकतो. भारताचा तिसरा सामना हेडिंग्ले या मैदानात होणार आहे. भारतीय संघ 2002 सालानंतर पहिल्यांदाच या …

Read More »

जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेएआय’च्या खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्तआकुर्ली (नवीन पनवेल) येथे नुकतीच जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया (यूएसकेएआय)च्या खेळाडूंनी यश संपादन केले.यूएसकेएआयच्या प्रद्युम्न म्हात्रे, आरव शेट्टी, अलोक निर्मल, अर्णव खन्ना, यश काटेकर, आयुरी धुमाळ, शशांक शेट्टी, साक्षी मुरडेकर, अनुष्का जगदाळे, वैष्णवी मुरडेकर, प्रणय दुरकर, श्रीवास पाटील, उदय …

Read More »

नेमबाज वेदांत पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या माध्यमिक विभाग मराठी माध्यमात इयत्ता आठवीत शिकणार्‍या वेदांत किरण पाटील याने रायफल शूटिंग प्रकारात घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली.अहमदाबाद येथे झालेल्या आठव्या वेस्ट झोन चॅम्पियन (प्री नॅशनल-सहा …

Read More »

संपूर्ण संघाचा मला अभिमान!

कर्णधार कोहलीकडून सहकार्‍यांचे कौतुक लंडन ः वृत्तसंस्था‘संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला 60 षटकांत गुंडाळू याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,’ अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहली याने सहकार्‍यांची पाठ …

Read More »

सुपर चषकावर चेल्सीची मोहोर

बेलफास्ट ः वृत्तसंस्था बदली गोलरक्षक केपा अरिझाबलगाने मोक्याच्या क्षणी अडवलेल्या दोन पेनल्टीच्या बळावर चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने आणखी एका जेतेपदावर मोहोर उमटवली. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी ‘सडन डेथ’पर्यंत रंगलेल्या सुपर चषकाच्या अंतिम फुटबॉल सामन्यात चेल्सीने व्हिलारेयालला 1-1 (6-5) असे नेस्तनाबूत केले. थॉमस टुकेल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या चेल्सीसाठी हकिम झियेचने 27व्या मिनिटाला …

Read More »

जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : कोमलिका बारी अंतिम फेरीत

व्रोक्लॉ ः वृत्तसंस्था भारताची तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील (21 वर्षांखालील) रीकर्व्ह प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदकनिश्चिती केली असून तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे. जमशेदपूरच्या 19 वर्षीय कोमलिकाने यापूर्वी 18 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी …

Read More »

राहुलने ठोकला विक्रमांचा षटकार

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावले. भारताला मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वांत मोठे योगदान देणार्‍या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राहुलने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सर्वाधिक शतके करणार्‍या भारतीयांच्या यादीमध्ये तो 24व्या स्थानी आहे. त्याने या शतकासह …

Read More »

‘तसे’ करणे अपमानास्पद होते -मरिन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीमुळे 2018मध्ये पुरुष संघाची जबाबदारी काढून घेत महिला संघाची देणे हा निर्णय अपमानजनक होता, असे मत भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी व्यक्त केले आहे. नेदरलँड्सचे माजी हॉकीपटू मरिन 2017मध्ये भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात …

Read More »

अखेर केरळ सरकारला उपरती

ऑलिम्पिक खेळाडूंना जाहीर केले मोठे बक्षीस तिरुअनंतपूरम ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशला अखेर केरळ सरकारने मोठे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या खेळाडूंवर त्यांच्या राज्यातील सरकारांनी बक्षिसांचा वर्षाव केला असतानाच दुसरीकडे केरळ सरकारने कोणतेही बक्षीस जाहीर न केल्याने नाराजी व्यक्त …

Read More »