टोकियो ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. भारताने स्पेनचा 3-0ने पराभव केला. सिमरनजीत सिंह आणि रूपिंदरपाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानंतर स्पेनने आक्रमक …
Read More »विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : विदित गुजराथी उपांत्यपूर्व फेरीत
सोची (रशिया) ः वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने अझरबैजानच्या वासिफ डुरारबायलीवर 1.5-0.5 अशा फरकाने विजय मिळवत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तब्बल 19 वर्षांनी प्रथमच एखाद्या भारतीय बुद्धिबळपटूने अशी कामगिरी केली आहे.पाचव्या फेरीतील दुसर्या डावात विदितने पांढर्या मोहर्यांनिशी खेळताना वासिफवर 38 चालींमध्ये विजय …
Read More »टोकियो ऑलिम्पिक : भारताची बॉक्सर लोव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत; पदकापासून एक विजय दूर
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरली आहे. 64-69 किलोग्राम वजन गटात तिने जर्मन बॉक्सरला 3-2ने पराभूत केले. लव्हलिना ही पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. एकदा उपांत्य फेरी गाठल्यानंतर तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. उपांत्यपूर्व सामना 30 जुलै रोजी होईल. लोव्हलिनाने संपूर्ण सामन्यात तिच्यापेक्षा अधिक अनुभवी …
Read More »पहिल्या टी-20मध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय; मालिकेत 1-0ने आघाडी
कोलंबो : वृत्तसंस्था कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान ठेवले होते, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.3 षटकात गुंडाळला. श्रीलंकेचा संघ केवळ 126 धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारने …
Read More »ऑलिम्पिक खेळाडूंना भारत सरकारचा दिलासा; भारतात येताना कोरोना चाचणीतून सूट
टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार्या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधून बाहेर पडण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने सांगितले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची …
Read More »भारताच्या प्रिया मलिकला सुवर्णपदक; जागतिक कुस्ती स्पर्धा
हंगेरी ः वृत्तसंस्था हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे आनंद व्यक्त होत आहे. प्रिया मलिकने जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. प्रियाने बेलारुसच्या …
Read More »टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. सिंधूने पोलिकार्पोवाचा 21-7, 21-10 असा पराभव करून दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त 29 मिनिटांत सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली. रिओ (ब्राझील) ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी. …
Read More »टोकियो ऑलिम्पिक : मेरी कोम अंतिम 16मध्ये
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर मेरी कॉम हिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. सहा वेळा विश्व चॅम्पियन असलेल्या ‘सुपर मॉम’ मेरीने अंतिम 16मध्ये प्रवेश केला आहे. मेरीने डोमिनिकाच्या मिगुएलिना हर्नांडेज हिला 4-1ने पराभूत केले. मणिपूरची 38 वर्षीय मेरी कोम टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय दलाची ध्वजवाहक होती. …
Read More »ऑलिम्पिकमध्ये भारताने उघडले पदकांचे खाते; मीराबाई चानूने जिंकले रौप्यपदक
टोकियो ः वृत्तसंस्था भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात शनिवारी (दि. 24) रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले, तर भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसर्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले, मात्र …
Read More »टोकियो ऑलिम्पिक उद्घाटनाचा मर्यादित पण नेत्रदीपक सोहळा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व
टोकियो ः वृत्तसंस्था कोरोनाच्या सावटामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शुक्रवारी (दि. 23) जपानच्या नॅशनल स्टेडियमवर टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आलेले नयनरम्य देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध संचलन या बाबींनी जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper