Breaking News

क्रीडा

‘वानखेडे’लाही चक्रीवादळाचा फटका; साईड स्क्रीनचे नुकसान

अहमदाबाद ः वृत्तसंस्था तौक्ते वादळाने महाराष्ट्र किनारपट्टीला हादरवून सोडले. मुंबईतही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वार्‍यामुळे पडझड झाली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. वादळामुळे स्टेडियमच्या नॉर्थ स्टॅण्डच्या साईड स्क्रीनचे नुकसान झाले आहे. तौक्ते वादळाने मुंबईकडून नंतर गुजरातच्या दिशेने कूच केली. तत्पूर्वी, त्याने वानखेडे स्टेडियमवरील 16 फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही …

Read More »

रमण यांचे बीसीसीआय, द्रविडला पत्र

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटविण्यात आलेल्या डब्ल्यू. व्ही. रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविडला पत्र लिहिले आहे. मला बदनाम करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे. प्रशिक्षकपदासाठीचा दावा इतर कारणांमुळे नाकारला गेला असेल, तर ते चिंताजनक आहे, असे रमण …

Read More »

दिनेश कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना विषाणू संसर्गामुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. आता टीम इंडियाचे खेळाडू आगामी इंग्लंड दौर्‍यासाठी सज्ज झाले आहेत, तर काही खेळाडू आगामी काळातील योजनांचा विचार करीत आहेत. अशात कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने आता नव्या क्षेत्रात उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिक इंग्लंड …

Read More »

बिग बॅश लीग : शफाली करणार सिडनीचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला संघाची सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा या वर्षी महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल)मध्ये सिडनी फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करणार आहे. शफाली पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायझी आधारित टी-20 स्पर्धेत खेळेल. हरियाणाची रोहतक येथे राहणारी 17 वर्षीय शफाली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. तिने 22 सामन्यांत 29.38च्या सरासरीने …

Read More »

ऑस्ट्रेलियाचे डग क्रोवेल यांची किमया 91व्या वर्षीही करताय फटकेबाजी

सिडनी ः वृत्तसंस्था इच्छा असली की सर्व गोष्टी साध्य होतात, असे म्हटले जाते. याची प्रचिती एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूकडून आली. हा क्रिकेटपटू चक्क 91व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करतोय. डग क्रोवेल असे या क्रिकेटपटूचे नाव असून, ते या वयात खेळणार्‍या एका दुर्मीळ गटाचा भाग आहेत. त्यांनी मोठ्या स्तरावर ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले …

Read More »

भुवनेश्वर कुमार घेणार निवृत्ती?

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भुवनेश्वरला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही आणि तो फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत आहे. भुवनेश्वरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. …

Read More »

श्रीलंकन क्रिकेटमध्ये भूकंप; पगार कपातीमुळे प्रमुख खेळाडूंचे बंड; नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार

कोलंबो ः वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांपासून मैदानातील कामगिरी खालावलेल्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये आता भूकंप झाला आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अँजलो मॅथ्यूज, सुरंगी लकमल, दिमूथ करुणारत्ने आणि दिनेश चंडीमल या प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या पगारात कपात केल्यामुळे नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या खेळाडूंच्या पगारात कपात केल्यामुळे त्यांनी …

Read More »

दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आल्याचे वृद्धिमान साहाकडून खंडन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी शुक्रवारी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने प्रतिक्रिया दिली.साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारूपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा …

Read More »

राफेल नदालचा संघर्षपूर्ण विजय

रोम ः वृत्तसंस्थाराफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.आपला 35वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने 22 वर्षीय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना 3-6, 6-4, 7-6(3) विजय मिळवला. नदाल पहिला …

Read More »