Breaking News

क्रीडा

कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता; पीटरसनकडून बीसीसीआयचे समर्थन

इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने कोरोना काळातही आयपीएल सुरू ठेवण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) समर्थन केले आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतात आयपीएल सुरू ठेवण्याचा निर्णय योग्य होता. या टी-20 लीगद्वारे काही तास लोकांचे मनोरंजन होत होते आणि हा एक दिनक्रम होता, असे पीटरसनने …

Read More »

जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा : कुस्तीपटू सीमाला सुवर्णपदक

इक्वाडोर : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने 29 वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. 2019मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक ऑलिम्पिक …

Read More »

कोरोनाविरुद्ध मोहिमेत ‘विरुष्का’चा सहभाग

दोन कोटींची मदत, इतरांनाही आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल स्थगित झाल्यानंतर घरी परतलेल्या विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेतला आहे. ‘केट्टो’सोबत मिळून हे दोघे निधी गोळा करणार आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाईल. त्यांनी स्वतः दोन कोटींची मदतही केली …

Read More »

भारतात आयपीएल आयोजित करणे चुकीचे नव्हते : गांगुली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे भारतात आयोजन करण्यात कोणतीही चूक नव्हती, परंतु प्रवासामुळेच जैव-सुरक्षा (बायो-बबल) परीघ भेदले गेले, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. ‘सहा जैव-सुरक्षित परिघांमधील केंद्रांवर आयपीएलच्या आयोजनाची योजना उत्तम होती. जैव-सुरक्षित वातावरणातही कोरोनाचा शिरकाव कसा झाला याचे नेमके कारण …

Read More »

आयपीएलसाठी तीन पर्याय

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा दुसरा टप्पा आता भारताबाहेरच होणे शक्य आहे. याकरिता संयुक्त अरब अमिराती (यूएई), इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन पर्याय उपलब्ध असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली. आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी उर्वरित सामने …

Read More »

मायकल हसी भारतातच राहणार!

मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातून येणार्‍या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातली. त्यामुळे ऑसी खेळाडू मालदिव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षितरीत्या भारत सोडले असून ते मालदिवच्या दिशेने प्रवास करीत आहेत, पण चेन्नई सुपर …

Read More »

आयपीएल स्थगितीमुळे कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांतील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयपीएलचे 14वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे, परंतु आंतरराष्ट्रीय वेळापत्रक पाहता ते अवघड वाटते. ही स्पर्धा पूर्ण न झाल्यास …

Read More »

भारतातील आयपीएल आयोजनाचे गांगुलींकडून समर्थन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलच्या 29 सामन्यांनंतर बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र यानंतरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतात आयपीएल खेळवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असतानाही इंडियन प्रीमिअर लीगच्या आयोजनावरून टीका होत आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा संयुक्त …

Read More »

टी-20 लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा

‘एसीए’ने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झापले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडलेत. 15 मेपर्यंत भारतातील विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारने बंदी घातलीय. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदिव किंवा श्रीलंकेत आसर्‍याच्या शोधात आहेत. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी …

Read More »

महेंद्रसिंह धोनीचा परदेशी खेळाडूंना आधार

मुंबई ः प्रतिनिधी देशातील कोरोना संकटामुळे बीसीसीआयने 10 मिनिटांच्या बैठकीत 14वी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे थैमान पाहून घाबरलेले परदेशी खेळाडू आता घरी कसे जायचे, असा सवाल करू लागले. त्यात अनेक देशांनी भारतातून येणार्‍या थेट विमानसेवांवर बंदी घातल्याने परदेशी खेळाडूंची चिंता वाढली. अशा वेळी कॅप्टन कूल …

Read More »