पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथे चिन्मय मिशन मुंबई तर्फे भगवद्गीता पठण 2019 च्या नवी मुंबई विभागीय स्तर स्पर्धा रविवारी (दि.8) झाल्या. यात विद्यार्थ्यांना भगवद्गीता अध्याय-18, श्लोक-40-78 पठणासाठी दिले होते. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. वरील स्पर्धेत ग्रुप-ए (नर्सरी,ज्यनिअर व सि.के.जी.) मध्ये …
Read More »भक्तीमय वातावरणात श्रीदत्त जयंती साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले दत्तगुरुंचे मनोभावे दर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जप करीत मोठ्या भक्तिभावाने पनवेल तालुक्यात दत्तजयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्या निमीत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वावंजे, मोर्बे, रिटघर, दूंदरे या ठिकाणी आयोजित केलेल्या दत्तजयंत्ती उत्सवांना भेट देऊन मनोभावे …
Read More »खारेपाट पाणीपुरवठा योजनेचा आढावा
आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी पेण : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून 38 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देवूनही रखडलेल्या पेण तालुक्यातील वाशी, शिर्की खारेपाट पाणीपुरवठा योजनेची आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 9) प्रत्यक्ष पाहणी करुन या योजनेचा आढावा घेतला. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील …
Read More »नागोठणे शिवाजी चौकातील वाहतूक कोंडीची एैसी की तैसी!
बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे संकेत नागोठणे : प्रतिनिधी बाजारहाटासाठी नागोठणे शहरात येणार्या नागरिकांकडून आपले दुचाकी, चारचाकी वाहन येथील शिवाजी चौक किंवा एसटी बसस्थानकाच्या आवारात उभे करण्याचा प्रकार सध्या वाढीस लागला आहे. बसस्थानक सध्या एसटी बसेसऐवजी खासगी वाहनांनी फुलून जात असल्याने एसटी बसेसना त्याचा प्रामुख्याने फटका बसत आहे. ही वाहतूक कोंडी …
Read More »माथेरानचे पर्यटन बहरणार
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. त्यामुळे सर्वांना लाल मातीच्या रस्त्यांनी हिवाळ्यात गुलाबी थंडीचा, तर उन्हाळ्यात थंडगार हवेचा आणि पावसाळ्यात धुक्याची चादर अनुभवण्यास मिळते. या शहरातील रस्ते आता कात टाकत आहेत. दरम्यान, माथेरान शहरात प्रवेश करणारा एकमेव रस्ता असलेल्या महात्मा गांधी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरुवात झाली …
Read More »हे तर चालायचेच
कित्येकदा आग लागलेल्या ठिकाणी असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्वकल्पना संबंधितांना असतेही. वापरकर्त्या सर्वसामान्यांकडून तक्रारीही केल्या जातात. परंतु हालचाल काहीच होत नाही. अखेर कित्येकांचा बळी गेल्यानंतरही त्याची जबाबदारी म्हणून कुणाला शिक्षा झाल्याचे नजीकच्या भविष्यकाळात तरी दिसत नाही. मग जबाबदारीने सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष तरी कुणी का देईल? उत्तर दिल्लीतील धान्य बाजार भागातील अनाज …
Read More »विविध गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद
पनवेल शहर पोलिसांची कामगिरी पनवेल ः वार्ताहर शहर पोलीस ठाण्याने केलेल्या धडक कारवाईत पनवेल शहर परिसरातील मोटरसायकल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले असून त्याचप्रमाणे इतर गुन्ह्यातील असे मिळून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असलेले चार विधीसंघर्षित बालकांना बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. गेल्या काही …
Read More »सोयीसुविधा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण
सिडकोच्या उद्यानांची जबाबदारी महापालिकेकडे पनवेल ः बातमीदार महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सिडको वसाहतीतील उद्याने, मैदानांची मालकी पनवेल महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यात आली आहे. यामध्ये सिडकोकडील 55 उद्याने आणि मैदाने पनवेल महापालिकेच्या नावे करण्यात आली आहेत. …
Read More »नरेंद्र मोदी झालासे कळस!
रविवार, 6 डिसेंबर 1992! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्या दिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी …
Read More »न्याय झाला, पण अत्याचार कधी थांबणार?
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या नराधमांनी पीडित डॉक्टरला बलात्कारानंतर ज्या ठिकाणी जाळून टाकले होते त्याच ठिकाणी चारही आरोपींचा खात्मा झाला. यामुळे न्याय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटली, तर काहींनी मात्र आरोपींना अशा पद्धतीने मारण्याबाबत नापसंती तसेच संशयही व्यक्त केला आहे. हैदराबादमधील घटना ताजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper