Breaking News

Ankit Shah

विमानतळ धावपट्टीच्या कामाला सुरुवात

प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर; उलवा नदी प्रवाह बदल करण्याच्या कामाला वेग पनवेल : बातमीदार गेली अनेक वर्षे या ना त्या कारणास्तव लांबणीवर पडत चाललेल्या नवी मुंबई विमानतळाच्या दक्षिण बाजूकडील धावपट्टीच्या कामाला येत्या 15 दिवसांत सुरुवात होणार असल्याचे सिडको सूत्रांनी सांगितले. या कामाला आता अधिक विलंब लागू नये, अशी सूचना सिडकोने विमानतळ बांधकाम …

Read More »

श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळ्याची सांगता

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील खुटुक बांधणवाडा येथे वासुदेव घरत आणि विनोद घरत यांच्या निवासस्थानी श्री राधाकृष्ण वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित ह.भ.प. अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची गुरुवारी (दि. 7) प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर येथे बुधवारी सुरू झालेल्या श्री …

Read More »

पनवेल शहर पोलिसांनी राबवली दंगा काबू योजना

पनवेल : वार्ताहर पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत हिंदू-मुस्लीम संमिश्र लोकवस्ती असलेल्या टपाल नाका परिसरात आज सकाळी दंगा काबू योजना राबविण्यात आली. संमिश्र लोकवस्तीत टपाल नाका-मिरची गल्ली-मुसलमान नाका-पटेल मोहल्ला-कोळीवाडा-उरण नाका-शिवाजी चौक असा रूट मार्च केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना डिब्रिफिंग केले. दंगा काबू …

Read More »

पागोटे येथे गड-किल्ले व रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण

पागोटे : प्रतिनिधी उरण तालुक्यातील जाणता राजा कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक मंडळ पागोटे आयोजित गड-किल्ले व रांगोळी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर छोट्या दोस्तांना व त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना व्यासपीठ मिळावे, याकरिता किल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाची कलाकृती ही अगदी अप्रतिम होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. रांगोळी स्पर्धेतील …

Read More »

गव्हाण फाटा-दिघोडे रस्त्यावर गतिरोधक बसवावे

माजी सरपंच विलास पाटील यांची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त गव्हाण फाटा-दिघोडे या रहदारीच्या रस्त्यावर अवजड कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक बेदरकारपणे होत असल्याने मोठ्या अपघातांची शक्यता बळावली आहे. पर्यायाने या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्वीप्रमाणेच गतिरोधक बनवावे, अशी मागणी भाजपचे युवा नेते व वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास पाटील यांनी केली …

Read More »

रायगडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचा करिष्मा

रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा आणि आज तो बालेकिल्ला संपुष्टात आला आहे.हे महत्त्वाचे राजकीय कार्य रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पार पाडले आहे. एक-दोन नाही तर तब्बल युतीचे पाच आमदार आणि भाजपचा सहयोगी सदस्य असे सहा आमदार युतीच्या विचारांचे निवडून आले …

Read More »

टिकाऊ पर्यटनाचा मार्ग

पाऊस अजूनही सुरूच आहे. आता तसा थंडीचा महिना सुरू झाला आहे. गुलाबी थंडीत आता पर्यटनासाठी लोंढे बाहेर पडतील. पर्यटनाची व्याख्या आता बदलली आहे. लोकांच्या खिशात पैसा आला आहे. त्यामुळे साधी पाण्याची बाटलीही सोबत न्यायला आता लाज वाटते. बदलत्या पर्यटनामुळे निसर्गसौंदर्याला बाधा येत आहे. पर्यटनस्थळे प्रदूषित होत आहेत. पर्यटकांनी पर्यटन करताना …

Read More »

मुरूडचा समुद्रकिनारा उद्ध्वस्त होण्याची भीती

कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्‍याची धूप, लाटांच्या मार्‍यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्‍याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्‍या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष …

Read More »

वेगवान उपाययोजना हवी

अनेक मानवनिर्मित वस्तू व कृतींमुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असून परिणामस्वरुपी पृथ्वीवरील तापमानात वाढ होते आहे. या तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरील हिमनग तसेच उंच पर्वतराजींवरील हिमावरण मोठ्या प्रमाणात वितळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होऊ लागल्याचे गेल्या अनेक वर्षांत आढळून आले आहे. येत्या अवघ्या 30 वर्षांत देशाची आर्थिक …

Read More »

सायन-पनवेल महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला वेग

नवी मुंबई : वृत्तसंस्था सायन-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात  खड्ड्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास तिष्ठावे लागत आहे. यावर उपाय म्हणून महामार्गावरील डांबरीकरणाच्या जागी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मध्यंतरी पावसामुळे शिल्लक कामे सुरू करण्यात आली आहेत. नियोजित …

Read More »