Breaking News

Ankit Shah

खोपोलीतील सार्वजनिक शौचालयांची होणार दुरुस्ती

खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानाच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम सुरू आहेत. या मोहिमेंतर्गत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह व शौचालयांची दुरुस्ती करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शौचालयांची पाहणी करून कामांच्या सूचना दिल्या. खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांमधील असुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी …

Read More »

पुढच्या वर्षी लवकर या!

धो धो पावसातही खोपोली-खालापुरात विसर्जन खोपोली ः प्रतिनिधी भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाची व पवित्र गौराईची यथासांग भक्ती करून शनिवारी (दि. 7) खालापूर-खोपोलीत बहुसंख्य सार्वजनिक व हजारो घरगुती गौरी गणपती बाप्पांचे कोसळणार्‍या धो-धो पावसात अत्यंत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे सांगत बाप्पाला निरोप देण्यात …

Read More »

स्काय इज द लिमिट!

अवघड खेळपट्टीवर तेही प्रतिकूल परिस्थितीत एखादा फलंदाज जेव्हा नेत्रदीपक फटकेबाजी करतो तेव्हा तो दर्शकांची वाहवा मिळवतो. आपल्या संघाची आशा असणारा हा खेळाडू त्याच्या नियोजनबद्ध खेळीने विजयाला गवसणी घालणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी तो दुर्दैवीरीत्या बाद होतो… असाच काहीसा प्रकार भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 बाबतीत घडला आहे. …

Read More »

वृक्षप्रेमी अवलिया बनलाय सर्वांचे आकर्षण

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. या कर्जत शहरात मध्यवर्ती ठिकाणी रल्वे लाईनच्या शेजारी असलेली, जणू हिरवागार शालू नेसून उभी असलेली तहसील टेकडी, तसेच खंडाळा घाटातून उगम पावून पायी पैंजण घालून जणू ठुमकत ठुमकत नागमोडा प्रवास करीत कर्जत शहरामधून पुढे वाहत जाणारी उल्हास नदी, ज्यामुळे कर्जतचे सौंदर्य अधिकच …

Read More »

नाठाळांची नकारघंटा

उदासीन कृतीशून्यतेने त्यांच्याकडे पाठ फिरवणार्‍यांना आता या सरकारने काही निर्णय घेतल्यावरच जाग आली आहे. आपण काही करायचे नाही, आणि दुसरे कुणी काही चांगले करीत असेल तर त्यात खोडा घालायचा, या प्रवृत्तीला काय म्हणायचे? खाजगी भागीदारीतून या किल्ल्यांचे संवर्धन होणार असेल तर त्यात गैर काय? निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही गोष्टीचा राईचा पर्वत …

Read More »

मानिवलीमध्ये जि. प. शाळा इमारतीला गळती

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अजूनही विद्यार्थी बसायला गेले नाहीत, मात्र त्या अगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणार्‍या …

Read More »

निजामपूर विभागात राष्ट्रवादीला हादरा

माणगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी यांनी येरद, येरद आदिवासीवाडी, कडापेवाडी, बांदलवाडी, कांदळगाव  येथील ग्रामस्थांसह गुरुवारी (दि. 5) शिवबंधन बांधले. त्यांचे आमदार गोगावले यांनी शिवसेनेत स्वागत केले.  येरद गावात झालेल्या या कार्यक्रमात सांगी आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनीही …

Read More »

शेकापला धक्का; कार्यकर्ते भाजपमध्ये

भाजपमुळेच मुरूड तालुक्याचा विकास होणार -अ‍ॅड. महेश मोहिते मुरूड : प्रतिनिधी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचेच आहेत. भाजप खर्‍या अर्थाने मुरूड तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देत असून, त्यामुळे कधी नव्हे इतका विकास झालेला मुरूडची जनता पाहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »

भारत-रशिया संबंध मजबूत

खासगी उद्योग सहकार्‍यांपर्यंत पोहोचले; पंतप्रधानांचे प्रतिपादन रशिया : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिवस्तोक येथे आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या पूर्ण सत्रामध्ये भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य केले. भारत-रशिया संबंधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे. त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्‍यांपर्यंत …

Read More »

विदर्भ मराठवाड्याची तहान भागविणे; हे तर कोकणचे भाग्य

कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन, कोकणी माणूस फणसाप्रमाणे राकट, तर हापूससारखा गोड, हा या मातीचाच गुणधर्म. अनेक साहित्यिक, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी अशी अनेक नररत्ने या मातीने महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी राष्ट्राला दिली. याच कोकणाने महाराष्ट्राला कोयनेची वीज दिली. आपले अस्तित्व संपवून जसे भगवंत शंकराने सृष्टीचे रक्षण …

Read More »