समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले कर्जत : बातमीदार – तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे. पाटबंधारे विभागाने कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरडोळे आणि वरई गावातील शेतकर्यांच्या जमिनी संपादित …
Read More »रायगडात तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न
अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भाताबरोबरच अंतरपीक म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 1200 किलो तूर बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात कडधान्याचे पीक घेतले जात नाही. केवळ भातावरच अवलंबून राहावे लागते. शेतकर्यांच्या …
Read More »रोहा एसटी स्थानकातील मैला अखेर उचलला
रोहे ः प्रतिनिधी – येथील एसटी स्थानकामधील शौचालयातील मैला स्थानकाच्या आवारात व रस्त्यावर येत होता. त्यामुळे प्रवासी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याची रोहा एसटी आगार व नगर परिषदेने गंभीर दखल घेतल्यानंतर ठेकेदाराने ताबडतोब हा मैला हटवण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून रोहा एसटी बस स्थानकातील शौचालयातील …
Read More »गुरव समाजाबद्दल अपशब्द; कारवाईसाठी पोलिसांना निवेदन
खालापूर : प्रतिनिधी – गुरव समाजाबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरणार्या इसमावर कारवाई करण्याची मागणी गुरव समाजाने खालापूर पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रात गुरव समाज अनेक पिढ्या वास्तव्यास आहे. हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी गुरव समाजाला मानाचे पान देऊन बहुमान केला होता. या समाजावर देव-देवळांची जबाबदारी …
Read More »पक्ष संघटना मजबूत करणार -महेंद्र दळवी
अलिबाग : प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी मी स्वीकारली आहे. सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी रविवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत सांगितले. अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी या वेळी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »नेरळ भाजपकडून आदिवासी भागात छत्र्यावाटप
कर्जत : बातमीदार – नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील ग्रामस्थांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमध्ये जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी छत्र्या वितरित केल्या. टपालवाडी आणि लव्हाळवाडीमधील आदिवासींनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या आदिवासी ग्रामस्थांचे आभार मानण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य …
Read More »पेणमध्ये भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
पेण : प्रतिनिधी – माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील प्रत्येक प्रभागात भाजप सदस्य नोंदणी व नवमतदार नोंदणी अभियान सुरू आहे. शहरातील कुंभारआळीमध्ये भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर व नेते विनोद शहा यांच्या उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. माजी सभापती मयुर कुंभार, शहर चिटणीस …
Read More »गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये शिरले पुराचे पाणी
जोहे, कळवे, तांबडशेत येथील कारागिरांचे नुकसान पेण : अनिस मनियार – गेल्या चार-सहा दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, कळवे येथील गणेशमूर्ती कारखाने व घरांमध्ये पाणी शिरले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पेण तालुक्यातील जोहे तलाठी सजामधील तांबडशेत, जोहे, कळवे या गावांत कच्च्या गणेशमूर्तीचे …
Read More »जीओ केबलचे काम अर्धवट; नागरिकांना त्रास
सुकापूर ः रामप्रहर वृत्त – सुकापूरमध्ये जीओच्या लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहनचालक, पादचार्यांना त्रास होत आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जीओची केबल टाकण्याचे …
Read More »डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल, वाशी, बेलापूर, तसेच नवी मुंबईतील इतर शहरांच्या जोडीने उलवे नोड परिसर देखील विकसित होत आहे. यापूर्वी उलवेच्या नागरिकांना सर्वच सुविधांसाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती, परंतु झपाट्याने होणार्या विकासामुळे उलव्यात आता अत्याधुनिक सोयीसुविधा येत आहेत. या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत रामशेठ ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper