Breaking News

Ramprahar News Team

वीकेण्ड लॉकडाऊनचे उल्लंघन दोन लाख 10 हजारांचा दंड वसूल

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2मध्ये पोलीस प्रशासनाने वीकेण्ड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांकडून दोन लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन लाख 13 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन आणि शासनातर्फे करण्यात येत आहे, …

Read More »

समस्या सोडविण्यासाठी संपर्क करा -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करीत असणारे कार्यक्षम माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यास नेहमीच तत्पर असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्त तसेच प्लाझ्मा आवश्यक गोष्ट असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून व इतर संपर्कातून गरजवंतांना त्वरित मदत करीत आहेत. त्यासाठी त्यांनी …

Read More »

उरण शहरात कडक पोलीस बंदोबस्त

उरण : वार्ताहर राज्यात गुरुवार (दि. 22) पासून नवीन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उरणमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याकरिता राज्यात कडक लॉकडाऊन करून त्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, दुध विक्रीची …

Read More »

औद्योगिक क्षेत्रातील शेकडो कामगार बेरोजगार; पनवेल परिसरातील कामे ठप्प

पनवेल : वार्ताहर सद्य स्थितीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत चालले आहे. रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी हॉस्पिटलला लागणार्‍या ऑक्सिजन व्यतिरिक्त औद्योगिक ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केल्यामुळे पनवेल आणि परिसरातील कटिंग आणि फेब्रिकेशन उद्योग पूर्णतः ठप्प झालेले आहेत. त्यामुळे या व्यवसाय मध्ये काम करणारे शेकडो कामगार बेरोजगार झाले …

Read More »

धवनकडून आयपीएलमध्ये पाच हजार धावांचे ‘शिखर’ सर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या …

Read More »

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा …

Read More »

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक; कोलकातावर मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानी

मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी मात करीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु …

Read More »

पत्रकारांबाबत राज्य सरकार उदासीन; मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे निषेध, शुक्रवारी सर्व संघटनांची बैठक

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून पत्रकार कोरोना महामारीचे वार्तांकन करीत आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या पत्रकारांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच केली आहे, मात्र या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही. संचारबंदीच्या काळात अधिस्वीकृतीधारक पत्रकार वगळता …

Read More »

पोलादपुरात कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष; केवळ निर्बंध, दंडावर भर

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वच सरकारी यंत्रणांनी कोरोना संसर्गाबाबतच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कडक निर्बंधांचे पालन करण्यास भाग पाडून दंडात्मक कारवाईदेखील करून वसुलीचा सपाटा लावला आहे. परिणामी शहरासह तालुक्यातील व्यापार व दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहेत. तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली …

Read More »

दिलासा! आणखी दोन स्ट्रेनवरही कोवॅक्सिन प्रभावी; ‘आयसीएमआर’चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने लसीकरण मोहीमेला आणखी वेग दिला आहे. कारण कोरोनाविरोधी लढाईत सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शस्त्र म्हणजे लस असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. आता लसीच्या मुद्द्यावर आपल्या सर्वांसाठी आयसीएमआरने (आयसीएमआर) चांगली बातमी दिली आहे. यामुळे देशाला कोरोनाच्या या संकटात काहिसा …

Read More »