अँटिगा ः वृत्तसंस्था एवीन लेव्हीसचे शतक (103) आणि शाय होपचे अर्धशतक (84) याच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विंडीजने पाच गड्यांच्या मोबदल्यात …
Read More »इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई सिटी विजेता
मुंबई ः प्रतिनिधी बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 2-1 असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली. फतोर्डा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने 18व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली, …
Read More »रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : भारताची द. आफ्रिकेवर मात
रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर 56 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांची झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 204 असा धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेला 7 बाद …
Read More »किसान क्रेडीट कार्ड योजनेत रायगड अव्वल
अलिबाग ः प्रतिनिधी सावकारी जाचातून मच्छीमारांची मुक्तता व्हावी आणि बँकेशी नाते जडावे यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेत रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेला रायगडातील मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार 1002 मच्छीमारांना चार कोटी 38 लाख रुपयांची कर्ज वितरित करण्यात आली आहेत. किसान क्रेडीट कार्ड …
Read More »नावडे येथील उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी; सुधारणा करण्यासाठी बैठक बोलविण्याचे निर्देश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नावडे येथे होत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 12) पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. नावडे येथील उड्डाणपुलामुळे नावडे गाव व नावडे फेज-2मधील …
Read More »सचिन वाझेंची एकाच दिवसात दोनदा बदली
मुंबई ः प्रतिनिधी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात वादग्रस्त ठरलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे. वझे यांना क्राइम ब्रांचमधून सुरुवातीला नियंत्रण कक्षात पाठवले गेले होते. आता त्यांची रवानगी नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष-1मध्ये करण्यात आली आहे. मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर …
Read More »एमपीएससी परीक्षा आता 21 मार्चला
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. याआधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात उद्रेक झाला होता. यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा …
Read More »पनवेल महानगरपालिकेत जैवविविधता समितीची स्थापना
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती व जैवविविधतेची माहिती गोळा करून त्याचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात येणार आहेच, शिवाय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित सदस्य असणार आहेत …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ
अहमदाबाद ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाला शुक्रवारी (दि. 12) प्रारंभ केला. पंतप्रधान मोदींनी साबरमतीमध्ये अमृत महोत्सवाचा शुभारंभ केला. यासह गुजरातमध्ये सहा ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंतप्रधानांनी साबरमती आश्रमपासून 386 किलोमीटर लांब दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांनी …
Read More »अफगाणी खेळाडूने रचला इतिहास कसोटीत ठोकले पहिले द्विशतक
अबुधाबी ः वृत्तसंस्थाअफगाणिस्तानचा 26 वर्षीय खेळाडू हश्मतुल्लाह शहिदीने शेख झायेद स्टेडियमवर सुरू असलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकले. या कामगिरीसह हश्मतुल्लाह अफगाणिस्तानचा द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. आपल्या कारकिर्दीतील पाचवा सामना खेळणार्या हश्मतुल्लाहने 443 चेंडूंचा सामना करताना 21 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 200 धावांची खेळी साकारली. हश्मतुल्लाहच्या द्विशतकी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper