Breaking News

Ramprahar News Team

‘भिकारीमुक्त पनवेलचा’ पोलिसांकडून संकल्प, कौतुकास्पद उपक्रमास पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -वपोनि अजयकुमार लांडगे

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाण पुलाखाली, मंदिर, मस्जिद परिसरात मुख्य नाक्यावर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भिकारी वास्तव्य करीत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढते. तर अनेक भिकारी आजारी पडून तेथेच प्राण सोडतात. त्यामुळे पुढील …

Read More »

रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा पर्याय

रस्ते बांधण्यासाठी डांबर वापरले जात होते. आजही डांबरीच रस्ते आहेत, परंतु आता राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरले जाते. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे रस्ते टिकत नाहीत. त्यासाठी पर्याय शोधला जात आहे. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लास्टिकचा वापार करून रस्ते बांधता येतात आणि हे रस्ते टिकतातदेखील हे सिद्ध केले आहे. त्यामुळे …

Read More »

आरे वनाचा चंद्र!

न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली. प्रस्तावित कारडेपोचा भूखंड हा जंगलाचा भाग नाही हे न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. तरी देखील पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामास स्थगिती देऊन एका आदर्श विकासकामात खोडा मात्र घातला. या स्थगितीपायी सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडत असून दररोज पाच …

Read More »

पिंपळपाडा येथील अंगणवाडी धोकादायक; विद्यार्थी घेताहेत अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै 2019पासून विद्यार्थी अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून  मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा …

Read More »

मुलींनी गैरवर्तनाची माहिती पालकांना द्यावी; जिल्हा न्यायाधीशांचा सल्ला

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या नात्यातला, ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही पुरुष आपल्याशी गैरवर्तन करीत असेल, तर मुलींनी त्याची महिती आपल्या पालकांना द्यावी. त्यामुळे पुढील धोके टाळता येतील,  असा सल्ला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) वर्षा मोहिते यांनी येथे दिला. बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयातील विद्यार्थिनींकरिता  आयोजित करण्यात …

Read More »

नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड

पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्‍या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …

Read More »

भाजप युवानेते पवन भोईर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा पनवेल महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, विजय म्हात्रे, शांताराम पाटील उपस्थित होते.

Read More »

पनवेल : माघी गणेशोत्सवानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरातील पायोनिअर विभागात असलेल्या गणेश मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. या वेळी अभिनव युवक मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, पत्रकार संजय कदम, चंद्रकांत पाटील आदी सोबत होते.

Read More »

नवीन पनवेल : अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ आणि अष्टविनायक पीएल 5 ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने माघी गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी भेट दिली व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी …

Read More »

भाजप जिल्हा संघटन चिटणीसपदी सतीश धारप, तर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी प्रीतम पाटील

अलिबाग : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा संघटन  सरचिटणीसपदी ज्येष्ठ नेते सतीश धारप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षपदी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी दिली. दक्षिण रायगड संघटनात्मकदृष्ट्या …

Read More »