Breaking News

Ramprahar News Team

बांगलादेशी बनला घरजावई

पनवेल ः बातमीदार चिखले येथून अटक करण्यात आलेला बांगलादेशी तेथील घरजावई असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. चिखले येथे घरजावई होण्यापूर्वी तो काही वर्षांपूर्वी तालुक्यातील बेलवली येथे राहत होता. त्यानंतर त्याने चिखले येथील एका मुलीसोबत लग्न करून तो घरजावई बनला होता. खोट्या नावाने वास्तव्य करणार्‍या ईनामूल यांच्याकडे पोलिसांना बोगस …

Read More »

वीजचोरी : 14 लाखांची वसुली, ‘महावितरण’कडून दोन महिन्यांत 63 घटना उघडकीस

पनवेल ः बातबीदार महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्यालयाने मागील दोन महिन्यांपासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने नोव्हेंबर व डिसेंबर 2019 मध्ये तब्बल 63 वीजचोरी उघडकीस आणून 14 लाख 51 हजार 250 रुपयांची वसुली केली आहे. सातत्याने वाढत चाललेली वितरण हानी ही प्रामुख्याने …

Read More »

ताटात मटण कमी दिल्याने पत्नीला जाळले

पनवेल ः बातमीदार  जेवणाच्या ताटात मटण कमी वाढल्याच्या कारणावरून पत्नीला जाळल्याची घटना कामोठ्याजवळील जुईगावात घडल्याचे बुधवारी उघड झाले. या घटनेनंतर पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 4 डिसेंबरला आरोपी पतीने रात्रीच्या जेवणात मटणाचा बेत आखला होता. यासाठी त्याने पत्नीकडे …

Read More »

दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करावेत, नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे प्रतिपादन

उरण ः वार्ताहर उरण नगरपालिका हददीतील दिव्यांग व्यक्तींनी परावलंबी न राहता स्वावलंबी बनण्याचे प्रयत्न करावे, असे प्रतिपादन उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. दिव्यांग व्यक्तींच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. तसेच दिव्यांग व्यक्तींना उदार्निवाहासाठी वर्षाला सहा हजार रुपये मदत रूपाने करीत आहे. व्यवसायासाठी कमी व्याजाच्या दराने कर्ज देत …

Read More »

खोपटा पूलनजीकच्या रस्त्यावर अपघात; वाहनचालक जखमी

उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील पूर्व विभागाला जोडणार्‍या खोपटा पुलापलीकडील कोष्टल रस्त्यावर सकाळी 11 वाजता दोन चारचाकी गाड्या रस्ता पार करीत असताना व्यागनार कारचालकाने गाडीला अचानक ब्रेक दिल्याने कार रस्त्यावर उलटली. या वेळी रस्त्यातून जात असलेल्या अनोळखी वाहनचालकांनी हा अपघात पाहून तत्काळ वाहनचालकाला बाहेर काढले. तसेच उलटलेली वॅगनार कार पादचार्‍यांनी …

Read More »

सांस्कृतिक वारसा जपणारे फडके विद्यालय

पनवेल ः प्रतिनिधी सांस्कृतिक वारसा, नैतिकता जपणारी शाळा म्हणजे फडके विद्यालय, असे प्रतिपादन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी आदर्श प्रशिक्षण अध्यापक केंद्राच्या मुख्याध्यापिका जाई जगताप यांनी केले.   पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात  गुरुवार दि. 12 …

Read More »

प्रस्तावित बांधकाम स्थळांना उपाध्यक्षांची भेट; गृहनिर्माण योजनेचा घेतला आढावा

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोच्या 95 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबईतील खारघर, खारकोपर रेल्वेस्थानक, बामणडोंगरी रेल्वेस्थानक, तळोजा येथील बांधकाम स्थळांना सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी भेट दिली व गृहनिर्माण योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत मुख्य अभियंता …

Read More »

उरण महाविद्यालयाची एकांकिका महाअंतिम फेरीत

उरण ः वार्ताहर ‘लोकसत्ता एकांकिका 2019’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी गुरुवारी (दि. 12) गडकरी रंगायतन येथे जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातर्फे सादर केलेल्या ‘हमीनस्तू’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत निवड झाली आहे. ‘गरफिर दौसबर रूये जमी अस्तू, …

Read More »

रिटघर विद्यालयात क्रीडा महोत्सव

पनवेल ः श्री. भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर विद्यालयात शुक्रवारी (दि. 13) शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बी. एस. नाईक यांच्या हस्ते झाले. विद्यालयाचे क्रीडा प्रमुख पी. डी. म्हात्रे यांनी विविध क्रीडा स्पर्धांचे नियोजन केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी …

Read More »

कांदाचोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या डोळ्यांत पाणी

पनवेल ः प्रतिनिधी कांद्याला सोन्याचा भाव आल्याने सामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले असताना पोलिसांनाही कांदाचोरांना शोधण्याचे काम करावे लागत आहे. अनेक पोलीस ठाण्यांत कांदाचोरीच्या तक्रारी दाखल होऊ लागल्याने पोलिसांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे. मराठी लोकगीतातील कांदा न भाकर घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे, असे …

Read More »