Breaking News

Ramprahar Team

उद्यानातील समस्या सोडवा -पांडुरंग आमले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा सेक्टर 7 मधील सिताराम मास्तर उद्यानातील समस्या सोडविण्याची मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 7 मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर हे विस्तिर्ण उद्यान आहे. या उद्यानात महापालिका प्रशासनाने …

Read More »

हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने उपक्रम पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभाग 18 मध्ये नाविन्यपूर्ण आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत असतात. माता भगिनींशी असलेला संवाद वाढवा आणि गप्पागोष्टींच्या माध्यमातून त्यांना काही क्षण विरंगुळ्याचे मिळावे या हेतूने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने हळदीकुंकू संमारंभ आयोजित करण्यात आला होता. या …

Read More »

विविध सामाजिक संस्थांनी मानले नगरसेवक राजू सोनी यांचे आभार

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे हे फलक लावून करीत आहेत. शहरातील आदर्श हॉटेल ते लाईन आळी आणि विनम्र हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यासंदर्भातची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळताच त्यांनी तत्परतेने या ठिकाणी रस्त्याची कामे …

Read More »

सीकेटी विद्यालयात विशेष पालक सभा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमातील विद्यालयात शनिवारी (दि. 12) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पालक सभा आयोजित केली होती. या सभेत 2021-22 मध्ये इयत्ता नववीत शिकत असलेले हे विद्यार्थी मार्च 2023मध्ये दहावी बोर्ड परिक्षेस सामोरे जातील, परंतु …

Read More »

‘झुक झुक गाडी’चा उपक्रम पनवेलसह रायगडात फोल

उशीराच्या दादर-सावंतवाडीवरील माहिती पाहणार कोण? पनवेल : प्रतिनिधी मध्य रात्रीच्या अंधारात पनवेलकरांना तर साखर झोपेत  दक्षिण  रायगडकरांना दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या अनेक विविध विकासकामांची माहिती व राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती तुतारी एक्स्प्रेसच्या (दादर-सावंतवाडी) माध्यमातून दिली जाणार आहे, मात्र साखर झोपेत आली आली झुक झुक गाडी…! स्वप्नांच्या दुनियेत स्टेशनवर जाऊ …

Read More »

नेरळ येथील जाहिरात कंपनीची पंचविशी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील पहिली आउटडोअर जाहिरात कंपनी म्हणून 1996 मध्ये काम सुरू केलेल्या साई अ‍ॅडव्हटायझिंग या कंपनीने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. ग्रामीण भागातून काम सुरू करणार्‍या या जाहिरात कंपनीने ग्राहकांची विश्वासहर्ता मिळवत ही मजल मारल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. भविष्यातील गरज ओळखून …

Read More »

कर्जतमध्ये बर्निंग कार

कर्जत : प्रतिनिधी कल्याण येथून लोणावळा येथे निघालेली फोर्ड कंपनीची डटसन गाडी कर्जत येथील चार फाटा येथे जळून खाक झाली आहे. कल्याण येथील चिकन घर येथे राहणारे किरण मोतीराम भोईर हे फोर्ड कंपनीच्या डटसन गाडी (एमएच 04 जीजे 9733) घेऊन आपल्या शेजारी राहणारे रजनीश चौबे यांना लोणावळा येथे डायलिसिससाठी घेऊन …

Read More »

ढाक भैरी डोंगरावर गिर्यारोहकाचा मृत्यू

खोपोली, कर्जत : बातमीदार कर्जत व मावळ तालुक्यातील लोणावळा नजीक असलेल्या ढाक बहिरी या डोंगरावर औरंगाबादच्या गिर्यारोहकाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 5) घडली. औरंगाबादचे प्रतीक आवळे, पंकज गावडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ व सागर जयस्वाल हे पाच जण गिर्यारोहणासाठी ढाक भैरी या डोंगरावर आले होते. गिर्यारोहण करीत …

Read More »

माणगाव-ताम्हाणी मार्गावर धोकादायक वळणे

अरुंद रस्त्यामुळे अपघाताला आमंत्रण; घाटातील प्रवास पर्यटकांसाठी ठरते डोकेदुखी माणगाव : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय दिघी बंदराशी जोडणार्‍या माणगाव-ताम्हाणी-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटाची संरक्षक भिंती धोकादायक आहेत. हा रस्ताही अरुंद व अवघड वळणाचा असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा येथून येणार्‍या पर्यटक, प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. येथील धोकादायक …

Read More »

गोवेले येथील शिवकालीन गणपती मंदिर

माणगाव तालुक्यातील गोवेले हे गाव गर्द हिरव्यागार झाडीत वनराईच्या सानिध्यात असून तेथील गणपती मंदिर पेशवेकालीन आहे व मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये हे मंदिर पेशवेकालीन असावे अशी नोंद आहे, कारण श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन हे जन्मगाव असून ते गोवेले याचमार्गे श्रीवर्धनला जात …

Read More »