Breaking News

Ramprahar Team

जनजाती सुरक्षा मंचतर्फे बाईक रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन आणि महान जनजातीय स्वतंत्र सेनानी तथा सनातन संस्कृती रक्षक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये साजरा झाला. त्यानिमित्त जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीने गाढेश्वर येथे बाईक रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅलीनंतर गावामध्ये आयोजीत केलेल्या सभेत रायगड जिल्हा जनजाती सुरक्षा …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेतील घरांची संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोमवारी (दि. 14) संगणकीय सोडत झाली. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका अदा करण्यात आल्या आहेत. …

Read More »

अल्पवयीन मुलगी तब्बल 400 जणांकडून बनली वासनेची शिकार

बीड ः प्रतिनिधी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत एका 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 400 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. विशेष म्हणजे यात एका पोलिसाचाही समावेश असून पीडिता आता दोन महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचा काही …

Read More »

स्थानिकांच्या रोजगारासाठी खालापूर भाजप आक्रमक

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब या आस्थापनेत निर्माण झालेल्या कामांमध्ये स्थानिक ठेकेदारांना काम देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड कोषाध्यक्ष सनी यादव यांनी एका निवेदनाद्वारे आस्थापना अधिकार्‍यांकडे केली आहे. एक्सप्रेस ग्रॅन्ड क्यूब आस्थापना स्थानिकांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा …

Read More »

तुळशी विवाहासाठीची साहित्य खरेदी सुरू

उरण : वार्ताहर कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अनेक सण साजरे झाले नाहीत. अनेक विवाहसुद्धा पुढे ढकलण्यात आले, मात्र आता स्थिती स्थिर असल्याने या वर्षी लग्न सोहळे जोरदार सुरू होतील. उरण बाजारपेठेत तुळशी विवाहासाठी लागणार्‍या साहित्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाह सुरुवात झाल्यावर लग्न सोहळे सुरू होतात. तुळशी विवाहासाठी प्रामुख्याने …

Read More »

गोरगरीब मुलांसोेबत ‘दिशा’चा बालदिन

पनवेल : रामप्रहर वृत्त बालदिनानिमित्त दिशा महिला व्यासपीठाने ओपन एज्युकेशनमधील मुलांसाठी बालमहोत्सव आसुडगाव येथे सोमवारी (दि. 15) आयोजित केला होता. यानिमित्त डोंबार्‍याचा खेळ करून पोटाची खळगी भरणार्‍या मुलांसाठी डॉ. कोलते व अनिता कोलते यांनी ब्रिजखाली सुरू केलेल्या शाळेत शिकणार्‍या मुलांसाठी हा दिवस आनंदात, उत्साहात जावा यासाठी आयोजन केले होते. चपलेऐवजी …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे हृदयतपासणी शिबिर

खारघर : प्रतिनिधी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांचे टुडी इको शिबिर झाले. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व श्री सत्यसाई संजीवनी सेंटर चाईल्ड हार्टकेअर अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक स्किल्स, खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 13) हे शिबिर झाले. 14 वर्षे वयोगटातील मुलांची या वेळी हृदयतपासणी करण्यात आली. जन्मजात मुलांमध्ये हृदयविकाराचे …

Read More »

नवी मुंबईत बालदिनी स्वच्छ चित्रकला स्पर्धा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बालदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ला सामोरे जात असताना स्वच्छ नवी मुंबई शहराविषयी मुलांच्या मनात असलेल्या संकल्पनांना मूर्तरूप देण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ चित्रकला स्पर्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम 2997 विद्यार्थ्यांनी सहभागी होत यशस्वी …

Read More »

राष्ट्र सेवा दलाच्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा समारोप

पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्र सेवा दल संघटनेच्या रायगड जिल्हा शाखा आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने 8 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत 12 ते 18 वर्षे वयोगटांतील तरुण-तरुणींसाठी पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथे सात दिवसीय व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप रविवारी (दि. 14) बालदिनी करण्यात …

Read More »

के. गो. लिमये वाचनालयात पंडित नेहरूंची जयंती आणि बालदिन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या संस्थेच्या वतीने बालदिनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सभासद दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी पं. …

Read More »