Breaking News

Ramprahar Team

कर्जत पोलिसांचा जिल्हा अधीक्षकांकडून सत्कार

कर्जत : बातमीदार ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केल्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बुधवारी (दि. 17) कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा विशेष सन्मान केला. कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरू असल्याबाबतची खबर मिळताच कर्जतच्या पोलीस पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास केला व आरोपींना अटक केली होती, तसेच …

Read More »

टोकेखार-सावली रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टोकेखार-सावली रस्त्याच्या बाजूला डोंगर आहे. पावसाळ्यात या डोंगरातील दगड व मातीचे थर रस्त्यावर येतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याला संरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुरूड-रोहा मार्गावरील टोकेखार ते सावली या भागात मोठा डोंगर असून तो रस्त्यालगतच आहे. दरवर्षी …

Read More »

धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेलमधील सुकलेले पामचे झाड आणि विद्युत वहिनीवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. प्रभागातील समस्यांचे निरसन करण्यास नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच तत्पर असतात. स्वतः जातीने हजर राहून नागरिकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील याकडे यांचा जास्त कल असतो. …

Read More »

खोपोलीतील एसएमएस कंपनीच्या जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी रुग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगाव येथे येऊ घातला असून जैविक कचर्‍यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत अनेक आजारांमुळे जीवनमान कमी होणार असल्याची भिती व्यक्त होत होती. त्यामुळे बुधवारी (दि.17) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या …

Read More »

पनवेल महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच होणार निश्चित

पनवेल : प्रतिनिधी महापालिकेचे फेरीवाला धोरण लवकरच निश्चित होणार असून त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली आहे, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मंगळवारी (दि. 16) झालेल्या फेरीवाला समितीच्या बैठकीत दिली. अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सहाय्यक वाहतुक …

Read More »

उरणमधील पाणथळीने घेतला मोकळा श्वास

पाण्याला अटकाव करणारे पाच मार्ग खुले उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे पाच बुजवलेले मार्ग खुले करण्यात आले आहे. सिडको, महसूल आणि वन विभागाचे अधिकारी, सोबतच नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे पर्यावरणप्रेमी तसेच मासेमारी समुदायाच्या प्रतिनिधींनी 300 हेक्टरच्या परिसरातील हे पाचही प्रवाह …

Read More »

उरणमध्ये पोलिसांकडून रूट मार्च

उरण : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या जातीय घटनांच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस परिस्थिती सांभाळण्यासाठी समर्थ असून सतर्क आहेत. जनतेमध्ये तसा संदेश देण्यासाठी मंगळवारी (दि. 16) सायंकाळी 5 वाजता …

Read More »

खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रोच्या रस्त्यावर पथदिवे उभारा

सिडकोकडे नागरिकांची मागणी खारघर : प्रतिनिधी सिडकोच्या विद्युत विभागाने खारघरमधील सेक्टर 34कडून सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पथदिवे उभारले नसल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला आहे. अंधाराचा फायदा घेत काही चोरट्यांकडून लूटमार होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या विद्युत विभागाने या रस्त्यावर पथदिवे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.  सिडकोने खारघर शहर …

Read More »

वेश्वीतील बर्फ कारखाना आणि शीतगृह खातेय धूळ

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण तालुक्यातील वेश्वी येथील तीन कोटी 42 लाख रुपये खर्चाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धूळ खात पडला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा वापर हा काही लोकांनी आपल्या दारू अड्ड्यासाठी बनविला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांनी सदर प्रकल्पाच्या कामाची चौकशी …

Read More »

राजभवनात लहान मुलांसाठी रंगला कट्टी बट्टी कार्यक्रम

गंधार गौरव पुरस्कारांचेही वितरण मुंबई : प्रतिनिधी बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणार्‍या गंधार कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या कट्टी बट्टी या कार्यक्रमाचे तसेच गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे रविवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव …

Read More »