Breaking News

Ramprahar Team

सोशल मीडियावर आक्षेपजनक पोस्ट; खोपोलीत तणाव

खोपोली : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकल्याच्या संदर्भात सोशल मीडियावर खालापूर तालुक्यातील एका तरुणाने आक्षेपजनक पोस्ट टाकली. ती पोस्ट झपाट्याने वायरल झाल्यानंतर खोपोलीमध्ये याबाबत तणाव निर्माण झाला. या पोस्टला आक्षेप घेत मंगळवारी (दि. 2) सकाळी खोपोली पोलीस ठाण्यावर अनेक तरुणांनी धडक देत, संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी …

Read More »

भाजप कामगार मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी पालीतील राजेंद्र गांधी यांची नियुक्ती

पाली : प्रतिनिधी भाजप कामगार मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीसपदी सुधागड पाली येथील ज्येष्ठ सक्रिय कार्यकर्ते राजेंद्र महादेव तथा भाऊ गांधी यांची, तर सुधागड तालुका अध्यक्षपदी रवींद्र खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना भाजप कामगार मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले. राजेंद्र गांधी …

Read More »

नियम पाळा; अन्यथा कारवाईला सामोरे जा!

माथेरान पोलिसांचा अश्वचालकांना इशारा कर्जत : बातमीदार पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने माहिती पुरविणे, अवाजवी दर आकारणे, विनापरवाना घोडे चालविणे, तसेच नियमांचे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर यांनी येथील अश्वचालकांना दिला. कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावले माथेरानकडे वळू लागली असून, दिवाळीच्या सुट्टीत …

Read More »

दीवाळीनिमित्त कलाकारांना व्यासपीठ

नगरसेविका राजश्री वावेकर यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय संस्कृती ही उत्सवांची संस्कृती म्हणून ओळखली जाते. देशातील वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृती एकमेकांना पूरक स्वरूपाच्या आहेत. सणांच्या निमित्ताने समाजातील कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठाची आवश्यकता असते. अशा वेळी नगरसेविका राजश्री वावेकर यांनी कलाकारांना दिवाळीनिमित्त कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध …

Read More »

मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत काळसेकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पनवेलमधील अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक महाविद्यालयात नुकतीच मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोफत लसीकरण अभियानांतर्गत सुमारे 100 विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा …

Read More »

सुरेश पोसतांडेल यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड

उरण : वार्ताहर सुरेश पोसतांडेल हे उरण नगर परिषद येथे लेखाधिकारी पदावर काम करीत आहेत. नगर परिषद, नगरपंचायत कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करीत आहेत. सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे काम …

Read More »

उरण येथे महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांची प्रदर्शन, विक्री

उरण : वार्ताहर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत, प्रेरणा व शिवसंग्राम महिला ग्रामसंघ केगाव आयोजित उरण नगर परिषदेच्या सहकार्याने महिला स्वयंसहायता समूह आणि महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाची जाहिरात आणि विक्री व्हावी हा उद्देश ठेवून दोनदिवसीय प्रदर्शन आणि विक्री मेळावा महिलांच्या उत्कर्षासाठी मेहनत घेणार्‍या जयश्री रमाकांत पाटील, प्रज्ञा सुधीर पारधी …

Read More »

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या दोघांना अटक

पनवेल ः वार्ताहर दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केले. याबाबत अधिक माहिती अशी की, हे आरोपी अल्पवयीन मुलींना घेवून भोसरी पुणे परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अपहरण मुलींच्या आईंना घेवून कामोठे पोलीस ठाण्याचे विशेष पथक सलग दोन दिवस त्या ठिकाणी …

Read More »

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर स्पा व्यवसाय चालविणार्‍या महिलेकडे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून तिच्याकडे खंडणीची मागणी करून न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करणारा तोतया पोलीस अधिकारी इसमास खारघर पोलिसांकडून अटक करण्यात आली. यातील आरोपी याने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तशी वेशभूषा करून तक्रारदार महिलेचे ब्युटी पार्लर व स्पाचे …

Read More »

अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्या महिलेला अटक

पनवेल ः वार्ताहर अल्पवयीन मुली व स्त्रियांकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या एका महिलेस कामोठे पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्या ठिकाणाहून दोन अल्पवयीन मुली व तीन स्त्रियांची सुटका केली आहे. कामोठे परिसरात अल्पवयीन मुली व स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन पैशांसाठी त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांनी एक …

Read More »