पनवेल : वार्ताहर वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून गाड्यांची परस्पर विक्री करणार्या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप राघो शेट्टी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल दिपक वाझे व इतर साक्षीदारांना संदीप शेट्टी याने वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून त्यांची वाहने ताब्यात घेतली. दोन ते तीन महिने …
Read More »भाजप खारघर मंडलच्या वतीने सेवा समर्पण अभियानअंतर्गत अन्नदान
खारघर : रामप्रहर वृत्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर मंडलात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. या अभियानात सेवा अभियान कार्यप्रमुख व खारघर मंडलाचे उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या वतीने 500 नाका कामगार व गरीब वस्तीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या …
Read More »भाजपतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण
उरण : वार्ताहर प्रत्येक गाव कोविड मुक्त व्हावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भारतीय जनता पक्ष बालईतर्फे बालई गावामध्ये मोफत कोरोना लसीकरण कार्यक्रम झाला. लस घेतलेल्या 125 नागरिकांना भाजप बालई गाव अध्यक्ष महेश माळी यांच्या वतीने एक किलो साखर, एक फ्रुटी, आणि एक बिसलरी पाण्याची बाटली देण्यात आली. बालई …
Read More »ग्रामपंचायतींच्या थकीत कराची समस्या त्वरित सोडवा -आमदार महेश बालदी
जेएनपीटी प्रशासनासोबतच्या बैठकीत मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सोनारी, करळ, जसखार, नवघर, फुंडे, जासई, चिर्ले, धुतुम, पागोटे, हनुमान कोळीवाडा, नवीनशेवा या एकूण 11 ग्रामपंचायतींच्या थकीत कराबद्दल उरणचे आमदार महेश बालदी यांनी जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन ग्रामपंचायतींना मिळणार्या थकीत करा बद्दल चर्चा करून थकीत कर त्वरित मिळावे …
Read More »भरकटलेल्या दोन आदिवासी मुलींचे पालक शोधण्यात मुरूड पोलिसांना यश
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव जेट्टी परिसरात दोन अल्पवयीन आदिवासी मुली बराचवेळ फिरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन मुरूड पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्यांच्या पालकांना शोधून काढले व त्या अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या. नांदगाव जेट्टी परिसरात दोन आदिवासी अल्पवयीन मुली फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस …
Read More »द्रुतगती महामार्गावर दोन वाहनांना लागली आग
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहने जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना गुरुवारी (दि. 7) रात्री रात्री 11च्या सुमारास मुंबई लेनवर तर दुसरी घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाल्या. …
Read More »श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सवाला परवानगी
आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर रोहे : प्रतिनिधी श्री धावीर महाराज पालखी उत्सवाच्या दरम्यान कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आयोजकांनी लक्ष द्यावे. व भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रोहे येथे केले. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नुकताच श्री …
Read More »प्रतापगडसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या
पोलादपूर : प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी …
Read More »नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिराचेही दार उघडले
मुरूड : प्रतिनिधी राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेतल्याानंतर घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. 7) नांदगाव येथील श्री सिध्दिविनायक मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. रायगडच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी घेत चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट, सेवा मंडळ-नांदगाव, सालकर जोशी पुजारी ट्रस्ट यांनी गुरुवारी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले आणि भक्तांसह, …
Read More »महडचे वरदविनायक मंदिर भाविकांनी फुलले
खोपोली : प्रतिनिधी कोरोना संसर्ग निर्बंधामुळे बंद असलेल्या महड (ता. खालापूर) येथील वरदविनायक मंदिराचे दरवाजे घटस्थापनेच्या दिवशी (दि. 7) उघडण्यात आल्याने पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते. अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिर गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते. सतत गजबजणारे हे मंदिर भाविकांविना सुनेसूने वाटत होते. संभाव्य तिसर्या लाटेमुळे मंदिर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper