दोन दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे सादर होणार अहवाल अलिबाग : प्रतिनिधी महाड, पोलादपूरात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या यानंतर या सर्व गावांची भुवैज्ञानिकांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ते आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहेत. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये, हिरकणीवाडी येथे तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, साखर सुनातरवाडी, …
Read More »काशीद पूल दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळाली शासकीय आर्थिक मदत
मुरूड : प्रतिनिधी काशीद पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या विजय चव्हाण यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश तहसीलदार गमन गावित यांनी प्रदान केला. अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्यातील काशीद येथील छोटा पूल 11 जुलै रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत विजय चव्हाण (रा. एकदरा) यांचा मृत्यू झाला होता. भारतीय जनता पक्षाचे दक्षिण …
Read More »महाडच्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पाली : रामप्रहर वृत्तसेवा महापुराने महाडमध्ये आतोनात नुकसान केले आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईसभाई कादरी यांनी महाडमधील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अतिवृष्टीमुळे सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांना पूर येऊन, पुराचे पाणी महाड शहर व परिसरातील घरे आणि दुकानांमध्ये घुसले होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर …
Read More »कर्जतच्या आसल आदिवासीवाडीत घर खचले
कर्जत : बातमीदार अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील आसल आदिवासीवाडीमधील भिमीबाई सांबरी यांचे घर खचले आहे. त्यामुळे त्यांना घरात राहणे धोकादायक झाले असून शासनाने तत्काळ त्या महिलेला मदत देण्याची मागणी होत आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आसलवाडीमध्ये भिमीबाई सांबरी यांचे कुडामेडीचे घर आहे. मुसळधार पावसामुळे या महिलेचे घर पूर्ण खचले …
Read More »गाडली गेली घरे, उद्ध्वस्त झाले संसार!
महाडमध्ये पुरात तीन, तर दरडीखाली 84 मृत्यू ; हजारो कोटींचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या महाप्रलयात तळीये गाव नकाशावरूनच गायब झाले, तर महाड शहरासह सुमारे 103 गावांना या महापुराचा फटका बसला आहे. यामध्ये हजारो कोटींचे नुकसान झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण बेपत्ता …
Read More »रस्त्यावर कचरा न टाकण्याचे अनोखे आवाहन
नगरसेवक राजू सोनी यांची संकल्पना पनवेल : वार्ताहर रहिवाशांसह दुकानदारांनी त्यांच्या घरातील तसेच दुकानातील साठणारा कचरा उघड्यावर रस्त्यावर फेकू नये व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने एक संकल्पना योजली. यामध्ये परिसरात दोन फुलझाडांच्या चांगल्या कुंड्या ठेवून तसेच फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले …
Read More »नाथकृपा प्रतिष्ठानकडून महाडकरांना मदत
कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील नाथकृपा प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी महाडजवळील कोंडीवते, आसनपोई, कुणबी आळी महाड शहर या ठिकाणी पूरग्रस्तांना दहा गोणी कपडे, अत्यावश्यक सेवेचे रोजचे लागणार्या सामानाचे साठ किट, दीडशे किलो तांदूळ, प्रथमोपचार औषध व पाण्याचे बॉक्स यांचे वाटप केले. वस्तूंचे वाटप झाल्यानंतर त्या ठिकाणी काही घरांमध्ये चिखलाची साफसफाई …
Read More »नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या हस्ते खारघरमध्ये कोरोना लसीकरणाचा प्रारंभ
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 20 येथील पोलारीस हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या हस्ते व भाजप खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी पोलारीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अजिंक्य भंडारी, डॉ. अतुल खरात व इतर कर्मचारी उपस्थित होते. शहरातील 18 …
Read More »कामोठे भाजपकडून पूरग्रस्तांना साहित्य रवाना
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे पूरग्रस्तांसाठी महाडकडे बुधवारी (दि. 28) मदत रवाना करण्यात आली. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, भाजप ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, पनवेल बार कौन्सिलचे ऑडिटर अॅड. धनराज तोकडे, समाजसेवक केशव घरत, निवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित होते. महाड पूरग्रस्तांकरिता कामोठेवासीयांसह …
Read More »पूरग्रस्तांना एक कोटींची मदत द्या
आमदार मंदा म्हात्रेंची नवी मुंबई महापालिकेकडे मागणी; आयुक्तांसोबत बैठक नवी मुंबई : प्रतिनिधी आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. राज्यातील पूरग्रस्तांना पालिकेमार्फत एक कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी या वेळी त्यांनी केली. आयुक्तांनीही प्रतिसाद देत लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper