Breaking News

Ramprahar Team

पनवेलच्या गाढी नदीतून जलपर्णी बाहेर काढण्यास सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त तक्काजवळील असलेल्या गाढी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेला नदीतून जलपर्णी बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून तत्काळ कार्यवाही करीत नदीतून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक …

Read More »

विंधणे तलावात मृत माशांचा खच

वातावरणातील बदलामुळे मत्स्यशेती व्यावसायिकांवर संकट उरण : प्रतिनिधी दिवसेंदिवस वातावरणातील होणार्‍या बदलामुळे उरण तालुक्यातील विंधणे येथील मत्स्यशेती करणार्‍या शेतकर्‍याच्या तलावातील दीड ते दोन टनापेक्षा अधिक वजनाचे मासळीचा खच मारून पडल्याने मत्स्यशेतीपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या मत्स्यव्यवसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अतिशय मेहेनतीने मत्स्यव्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याचे मोठे …

Read More »

सहकाराचा नवा मंत्र

सहकार चळवळीची बव्हंशी सूत्रे राज्य सरकारांच्याच हातात असतात. बहुराज्यीय (मल्टिस्टेट) संस्था सोडल्यास बाकी सर्व संस्था या बहुश: स्थानिकच असल्याकारणाने हे घडते. त्यामुळे साहजिकच सहकार चळवळ फोफावण्याला भौगोलिक आणि सामाजिक मर्यादा येतात. हे चित्र ओळखून पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील …

Read More »

राजमुद्रा फाऊंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी  श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, …

Read More »

खोपोली कोविड सेंटरला रुग्णोपयोगी साहित्याची भेट

खोपोली : प्रतिनिधी येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली.  या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, …

Read More »

कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी

‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष अलिबाग : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून …

Read More »

उघाडीचा लिलाव पुन्हा करा

पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्‍यांनी केली आहे.  खारभूमी विकास विभागाच्या …

Read More »

घोणसे ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार

सरपंच, ग्रामसेवकांच्या चौकशी व निलंबनाची मागणी म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतीच्या बहुतांश आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचे दिसत असून, सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी आणि निलंबीत करावे, अशी मागणी माहिती आधिकार कार्यकर्ते योगेश महागावकर व ग्रामस्थांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे …

Read More »

खोपोली नगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांचा विरोध

खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाचा आदेश नसताना व स्थायी समितीला अंधारात ठेवत परस्पर घेण्यात आलेल्या या मालमत्ता कर वाढीला नगरसेवकांकडून विरोध केला जात आहे. नगरसेवक किशोर पानसरे यांनी मालमत्ता कर वाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी आवाज उठवला आहे. मालमत्ता कर …

Read More »

भाजप किसान मोर्चाकडून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन

कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत येथे नुकतेच शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेतकरी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केले. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आण्णासाहेब …

Read More »