पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही ठिकाणी भात पिकाची लावणी खोळंबली आहे. अपुर्या पाण्यामुळे काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या आहेत. रोग व किडींचा प्रादूर्भाव झाल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. परंतु जीवाला घोर लावून न घेता शेतकर्यांनी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ …
Read More »अशी असते लोकशाही
अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांना कुठलेही संसदीय अस्त्र अथवा मार्ग वापरण्यास मनाई करण्यात आली होती. नवनवे मुद्दे उपस्थित करून सरकारला हैराण करणार्या विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठीच संसदीय आयुधांच्या वापराची मनाई करण्यात आली होती हे उघड आहे. अर्थात अशा हुकुमशाही कारभारामुळे कोणाची तोंडे बंद करता येणे अशक्यच असते. काही काळापुरती …
Read More »विविध मागण्यांसंदर्भात ‘बीएमएस’चे केंद्रीय नौकानयनमंत्र्यांना निवेदन
पुणे : प्रतिनिधी केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मांडविया यांचा शुक्रवारी (दि. 1) सीरम इन्स्टिट्युट येथे भेट देण्यासाठी दौरा होता. या दरम्यान त्यांना देशातील विविध पोर्टमधील परमनंट व कंत्राटी कामगारांनी कोविड काळात काम केलेल्या कामगारांना कोविड भत्ता मिळावा व कामगारांची पगारवाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी बीएमएस पोर्ट महासंघाच्या वतीने करण्यात आली. …
Read More »‘दिशा’कडून डॉक्टरांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून पनवेल परिसरातील या डॉक्टरांचा दिशा महिला मंचच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टरांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात आले. पेशाने डॉक्टर असलेल्या पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची मंचच्या संस्थापिका निलम आंधळे यांनी गुरुवारी (दि. 1) भेट घेत त्यांना शुभेच्छा …
Read More »आर्या वनौषधी संस्थेतर्फे वनौषधी रोपांचे डॉक्टरांना वाटप
पनवेल : वार्ताहर डॉक्टर्स डेचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेतर्फे डॉक्टररुपी देवदूतांना वनौषधी रोपे व सन्मानपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. आर्या वनौषधींच्या या कार्यक्रमास एकता आवाज फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम येलवे, आर्या पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉक्टरांना केवडा, निरब्राम्ही, …
Read More »कृषी दिनानिमित्त गुळसुंद्यात विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 1) कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताह मोहीम समारोप कार्यक्रम झाला. या वेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून …
Read More »नवी मुंबईत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल व श्री साई ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारा येथे रक्तदान शिबिर झाले. संस्थेच्या अध्यक्ष आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात स्थानिक तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दुपारी …
Read More »चिरनेरच्या अक्कादेवी बंधार्याला गळती
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील निसर्ग उपेक्षित राहिला आहे. त्यात पर्यटकांना आकर्षित करणार्या अक्कादेवी बंधार्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामुळे पावसाळ्यात बंधारा फुटला तर पाण्याचा लोंढा चिरनेर गावात शिरून रहिवाशांच्या जिवितास, भातशेतीस धोका निर्माण करू शकतो, अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई व रायगड …
Read More »संभ्रम नाट्य सुरूच
महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये पदांच्या वाटपावरून अंतर्गत धुसफूस असतेच. विधानसभाध्यक्ष पद काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे त्या पदावर काँग्रेसचाच नेता बसणार हे उघड असले तरी या बाबतीत होणारे राजकारण थांबायला तयार नाही. खुद्द काँग्रेस पक्षातच विधानसभाध्यक्ष पदासाठी कोणाचे नाव सुचवायचे यावरून अद्यापही एकमत झालेले दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर …
Read More »आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत
पनवेल : रामप्रहर वृत्त आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल ट्रस्ट आणि शंकरा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल हे नवीन पनवेल येथे नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. शंकरा आय फाऊंडेशन हे श्री कांची कामकोटी मेडिकल ट्रस्टचा एक भाग असून नेत्रचिकित्सेमध्ये गेल्या 44 वर्षांपासून निरंतर सेवेचे काम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper