Breaking News

Ramprahar Team

पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर उरणमधील सेव अवर बीच, उरण शटलर्स ग्रुप, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पीरवाडी समुद्रकिनारी रविवारी (दि. 6) सकाळी 7 ते 11 या वेळेत स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून युवकांचा यात खूप मोठा सहभाग …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी वृक्षसंवर्धन

पनवेल : वार्ताहर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या 347व्या वर्धापन दिनी पनवेलच्या गोल्डन ग्रुपने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करून महाराजांना आगळीवेगळी मानवंदना दिली. बीजांकुरण प्रकल्पाचे या वेळी उद्घाटनदेखील करण्यात आले. मोर्बे आणि रिटघर परिसरात संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रम केले आहेत. लावलेले प्रत्येक झाड जगवण्यासाठी ग्रुपचा प्रत्येक सदस्य …

Read More »

स्व. पत्रकार वचन गायकवाड यांना सहकार्यांनी वाहिली श्रद्धांजली

पनवेल ः वार्ताहर तळोजातील पत्रकार वचन गायकवाड यांनी अचानक एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने पनवेल तालुक्यातील पत्रकार एकवटले आणि त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. वचन गायकवाड यांच्या अचानक जाण्याने तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रासह तळोजा परिसरातील औद्योगिक क्षेत्रातूनही दुःख व्यक्त करण्यात …

Read More »

गरजू कलाकार, रिक्षाचालकांना धान्यवाटप

भाजप नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : वार्ताहर कोकण म्हाडाचे माजी सभापती तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब पाटील हे नेहमीच आपला वाढदिवस समाज हेच आपल कुटुंब असे मानून विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात. म्हणूनच गोरगरीब जनतेला आपलासा वाटणारा आणि नागरिकांसाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटणारा नेता …

Read More »

जेएनपीटीमुळे देशातील बंदर उद्योगास बळकटी

मे महिन्यात कंटेनर हाताळणीत झाली वाढ उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीटीने गेल्या काही महिन्यांत अनेक आव्हानांवर मात करीत माल हाताळणीत निरंतर वाढ सुरूच ठेवली आहे. गेल्या काही महिन्यांत जेएनपीटीने आयात-निर्यात समुदायासाठी व्यवसाय, कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व सुरळीत होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. जेएनपीटीने मे महिन्यात चार लाख 54 हजार 385 …

Read More »

मानवी साखळी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

आमदार महेश बालदी यांचे आवाहन उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते  दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी गुरुवारी (दि. 10) होणार्‍या मानवी साखळी आंदोलनास मोठ्या संख्येने सक्रीय सहभाग व्हावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. सर्व गावोगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, …

Read More »

पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजली!

दुकानांमध्ये नागरिकांची, तर रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये सोमवार (दि. 7) पासून अंशतः अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक दुकाने, आस्थापनांसह अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेसुद्धा आदेशानुसार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पनवेल बाजारपेठेमध्ये नागरिकांची तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर …

Read More »

मोदी हेच खरे औषध!

सौ सुनार की और एक लोहार की.. या हिंदी म्हणीचे प्रत्यंतर भारतीय जनतेला सोमवारी सायंकाळी आले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांसाठी केंद्र सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी अभूतपूर्व घोषणा करून सर्व विरोधकांची तोंडे कायमची बंद केली आहेत. इतकेच नव्हे तर, गरीब कल्याण योजनेअंतर्गत भारतातील …

Read More »

आगरकोट किल्ला प्रवेशद्वाराची पडझड

तिठ्यावरील शिल्पही ढासळले रेवदंडा : प्रतिनिधी येथील आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला तिठा असे संबोधले जाते. या ऐतिहासीक किल्ल्याच्या मोठ्या बंदराकडील प्रवेशद्वाराची पडझड झाली असून, तिठ्यावरील शिल्प (बोधचिन्ह) तुटून खाली पडले आहे. आगरकोट किल्ला रेवदंडा व कोर्लई जवळील समुद्रात आहे. किल्ल्यामध्ये जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात पोर्तुगीजांनी शिल्प कोरले होते. ते इतिहासप्रेमी …

Read More »

पाच पिढ्यांनंतरही आमच्याकडं रस्ता नायं!

खांदाड आदिवासीवाडीतील बांधवांनी मांडली व्यथा माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायत हद्दीतील मोर्बारोडवरील खांदाड आदिवासीवाडी विकासकामांपासून वंचित असून, वाडीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील आदिवासी बांधवांना विशेषतः पावसाळ्यात फार त्रास सहन करावा लागतो. पाच पिढ्यानंतरही आमच्याकडं रस्ता नायं, अशी व्यथा येथील आदिवासी बांधवांनी प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केली. माणगाव नगरपंचायत हद्दीतील खांदाड आदिवासीवाडीत 25 …

Read More »