Breaking News

Ramprahar Team

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जाहिरात फलक लावण्यासाठी केला जातोय जीवाशी खेळ

खोपोली : प्रतिनिधी  जीवघेण्या अपघातामुळे अगोदरच चर्चेत असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जाहिरात फलक लावण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. बुधवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील माजगाव येथील उड्डाणपुलावर जाहिरात फलक लावण्यार्‍या कामगारांना ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने पुरवली नव्हती. त्यामुळे फलक लावताना जर तोल गेला तर कामगारांच्या जीवावर बेतणार होते, …

Read More »

पेणमधील आदिवासी वाड्यांवर आरोग्य तपासणी

पेण : प्रतिनिधी येथील अंकुर ट्रस्ट आणि मैत्रेय राज फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती तसेच तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाचा फैलाव आता आदिवासी वाड्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र ही महामारी व लसीकरणाबाबत  आदिवासींमध्ये अनेक गैरसमज आहेत. तो दूर करण्यासाठी अंकुर ट्रस्ट …

Read More »

खोपोलीतील ताकई रस्त्याचे काँक्रीटीकरण संथगतीने

आरपीआयचा आंदोलनाचा इशारा खोपोली : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील ताकई रस्त्याच्या कामाचे  घोंगडं अनेक वर्षापासून भिजत पडलेले असतानाच  मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या काँक्रीटीकरणाचे काम कासवगतीने सुरु आहे. काम करण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावरून जाताना वाहनचाकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी …

Read More »

मुरूडमधील नारळ उत्पादक, बागायतदार अडचणीत

रायगड जिल्ह्यातील भात पिकापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारीचे मोठे उत्पन्न घेतले जाते. मात्र कोरोना महामारी, लॉकडाऊन तसेच निसर्ग व तौत्के चक्रीवादळाच्या दणक्याने सुपारीसह नारळाची बहुतांशी झाडे जमिनदोस्त झाल्याने येथील नारळ उत्पादक बागायतदार व व्यापारी संकटात सापडले आहेत. मुरुड तालुक्यातील बागायती क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक हेक्टर बागायत क्षेत्रातील हजारो नारळाची झाडे चक्रीवादळात …

Read More »

निर्बंधांची धग

कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापार्‍यांचे अपरंपार नुकसान झाले होतेच. त्यातून कसेबसे सावरत असतानाच कोरोनाची दुसरी लाट अंगावर आली. याहून अधिक नुकसान सहन करणे व्यापार्‍यांना निश्चितच परवडण्याजोगे नाही. सोबतच खाजगी नोकरी करणार्‍या नागरिकांना देखील आपली मासिक मिळकत चालू ठेवणे अवघड होत जाणार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये जीव जगवण्याला प्राधान्य आहे असे आपले …

Read More »

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदिगड ः वृत्तसंस्था कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अ‍ॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे …

Read More »

माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला

पृथ्वी शॉचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने …

Read More »

टी-20 वर्ल्डकपसाठी ओमानचाही पर्याय

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची …

Read More »

‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे

पाच भारतीयांचा समावेश नवी दिल्ली ः वृत्तसंस्था क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत …

Read More »

उरणमध्ये बुद्धपौर्णिमा उत्साहात

उरण : वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 26) भगवान गौतमबुद्ध यांची 2565वी जयंती उरण येथील बौद्धवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843चे अध्यक्ष प्रकाश …

Read More »