Breaking News

Ramprahar Team

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंची भारतात राहण्यास पसंती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचे महत्त्वाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या 14व्या मोसमात खेळत आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही परतण्याच्या विचारात आहेत, मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घरी परतण्यास …

Read More »

सचिनकडून ऑक्सिजनसाठी एक कोटींची मदत

मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर कोरोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. 250 उद्योजक तरुणांनी सुरू केलेल्या मिशन ऑक्सिजनसाठी सचिनने तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत …

Read More »

पृथ्वी वादळात कोलकाता गारद

अहमदाबाद ः वृत्तसंस्था सलामीवीर मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर आयपीएलच्या साखळी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 155 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने 16.3 षटकांतच विजय साकारला. पृथ्वीला …

Read More »

रोह्यातील रोठ बुद्रुक गावात जंतुनाशक फवारणी

‘क्लॅरिअंट’ची सामाजिक बांधिलकी रोहे : प्रतिनिधी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून क्लॅरिअंटकडून कारखान्यालगतच्या रोठ बुद्रुक गावाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. रोठ बुद्रुक गावामध्ये काही कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच नितीन वारंगे …

Read More »

सुधागडात कोरोनाविषयी जनजागृती

प्रभातफेरी व रंजक गाण्यांतून प्रबोधन पाली ़: प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. तालुक्यातील अडुळसे गाव आणि परिसरातील सात वाड्यांवर गुरुवारी (दि. 29) कोरोना विषयक जनजागृती …

Read More »

मानवतेचे निशाण मिरवू महाराष्ट्र दिनी!

महाराष्ट्राच्या वर्धापन दिनाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्याने या काळात अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचे राज्य देशाच्या नकाशावर अस्तित्वात आले. हुतात्म्यांचे बलिदान विसरून महाराष्ट्र दिन चिरायू होऊ शकत नाही हे जरी खरे …

Read More »

लॉकडाऊनमुळे मच्छीमार होड्या किनार्यावर

पावसाळ्यात खोल समुद्रातील  मासेमारी बंद ठेवावी लागते, त्या अनुषंगाने मुरूडमधील कोळी बांधव आपल्या मच्छीमार होड्या साधारण 15 मेपासून किनार्‍यावर लावतात. त्यानंतर होडीची साफसफाई, होडीतील सर्व जाळ्या स्वच्छ धुवून आपल्या घरी नेऊन ठेवतात. पाऊस सुरु होण्याआधी होड्या साकारण्यात येतात, मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने सर्वांनाच त्रस्त केले आहे. लॉकडाऊन, संचारबंदी, …

Read More »

प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी

पनवेल : वार्ताहर माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पुन्हा एकदा प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागात नेहमीच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रभागातील विकास कामांबरोबर नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजीही तत्परतेने घेत असतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रभागातील …

Read More »

जिल्हाबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई

सायन-पनवेल महामार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त पनवेल : वार्ताहर राज्यात जिल्हा बंदी असूनदेखील बिनदिक्खतपणे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरणार्‍यांवर आता पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे. यांचा प्रारंभ कामोठे पोलिसांनी केली आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशने जाणार्‍या मार्गावर मॅक डोनाल्डच्या विरुद्ध दिशेला नाका बंदी सुरू करून, वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली …

Read More »

मुंबई इंडियन्स राजस्थानवर भारी

साकारला ’रॉयल’ विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई इंडियन्सने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगलेल्या मुंबई इंडियन्सची गाडी ह्या सामन्यात रुळावर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे संघासाठी ही चांगली गोष्ट मानली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने …

Read More »